shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तलाठी महोदयांना जडलाय, स्वत:स कोंडून घेण्याचा छंद ! राहाता तलाठी कार्यालयाचे द्वार, आजही ग्रामस्थांसाठी बंद !!

तलाठी महोदयांना जडलाय,
 स्वत:स कोंडून घेण्याचा छंद !
राहाता तलाठी कार्यालयाचे द्वार,
 आजही ग्रामस्थांसाठी बंद !!

या गैरप्रकाराकडे मा.तहसिलदार
 साहेबांनी लक्ष घालण्याची मागणी..!!

शिर्डी प्रतिनिधी

 येथील तलाठी कार्यालय असून आडचण नसून खोळंबा असेच ठरत आहे, दररोज कामानिमित्त या कार्यालयात येणार्या सर्वसामान्य नागरीकांना बाहेरुनच हुसकाऊन शेकडो हेलपाटे मारण्यास भाग पाडणारी येथील कर्मचारी मंडळी कार्यालयात बसून नेमकी करते तरी काय ?असा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे,

साकुरी,पिंपळस आणि राहाता अशा तब्बल तीन गावांचा कारभार सांभाळणारे येथील तलाठी महोदय नेमकं किती किती वेळ या तीन्ही कार्यालयास देत असतील ?, 
की दामोजीरावांना बिनदिक्कतपणे घरपोच सेवा ?, आणि गरीबचंदांना कार्यालयाबाहेरच हुसकावण्याची नामी शक्कल तर याठिकाणी या खादाडांनी आवलंबविली नसेलना ?, सध्या असाही प्रश्न निर्माण होत असल्याने राहाता परिसरातील अनेक नागरीकांना या त्रासाचा सामना करणे भाग पडत आहे, याकरीता मा.तहसिलदार साहेबांनी गैरप्रकाराकडे वेळीच लक्ष घालून सर्वसामान्य नागरीकांना या त्रासापासून मुक्त करावे अशी राहाता परिसरातील त्रस्त नागरीकांकडून मागणी होत आहे.
close