shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीत श्री गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न...!!

शिर्डीत श्री गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न...!!
सावळीविहीर( प्रतिनिधी):
   श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस असून शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्री गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.काल शनिवारी शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आला होता.आज गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे श्री साई समाधी मंदिरात ठीक चार वाजता श्री साईंची काकड आरती करण्यात आली .


त्यानंतर सकाळी पाच वाजता श्री साईद्वारकामाई मंदिरात अखंड सुरू असलेल्या श्री साईचरित्र या पवित्र ग्रंथाच्या पारायणाची सांगता झाली. या पारायणात श्री साईबाबा संस्थान चे पुजारी यांनी पहिले पाच अध्याय काल वाचले होते. त्यानंतर संस्थानचेच कोरोना वॉरियर्स यांना पुढील अध्याय वाचण्याची संधी देण्यात आली होती. आज या अखंड श्री साई चरित्र पारायणाची श्री द्वारकामाई मंदिरात सांगता झाली, त्यानंतर श्री द्वारकामाई मंदिरातून श्री साईबाबांच्या फोटोची व श्री साई चरित्र या पवित्र ग्रंथाची द्वारकामाई, गुरुस्थान मार्गे श्री समाधी मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या पोथी व प्रतिमा मिरवणुकीत विना श्री साई संस्थांनचे पुजारी उदय वाळुंजकर यांनी घेतला होता तसेच पोथी पुजारी दिलीप सुलाखे यांनी घेतली होती. त्याच प्रमाणे श्री साईबाबांची प्रतिमा पुजारी विलास जोशी व चंद्रकांत गोरकर यांनी  घेऊन ही मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर साडेपाच वाजता श्री साईंचे मंगल स्नान करण्यात आले व सकाळी सहा वाजता शिर्डी माझे पंढरपुर ही आरती झाली. त्यानंतर सकाळी सहा वीस ला पुजारी दिलीप सुलाखे यांच्या हस्ते श्री साईबाबांची सपत्नीक पाद्यपूजा करण्यात आली. नंतर सकाळी नऊ वाजता श्री लेंडी बागेत श्री साईंच्या शताब्दी स्तंभावरील ध्वज बदलण्यात आला. श्री साईबाबांची दुपारी बारा वाजे दरम्यान मंदिरात मध्यान आरती करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी चार ते सहा या वेळेत श्री साई संस्थानच्या पुजारी यांच्याकडून समाधी मंदिरात किर्तन संपन्न झाले. त्यानंतर रात्री सात वाजता श्री साईंचे धुपारती करण्यात आली व रात्री साडेदहा वाजता श्री साईबाबांची शेजारती  संपन्न झाली.श्री साईबाबांचा गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस असून श्री साईबाबा संस्थान तर्फे हे नित्यनियमाप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम निर्विघ्न पार पडले.मात्र आज दरवर्षाप्रमाणे शिर्डीत बाहेरील साई दिंड्या, साई पदयात्री व लाखोंच्या संख्येने शिर्डीत श्री साई दर्शनासाठी येत असलेले साईभक्त दिसत नाही, मात्र शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त श्री साईबाबा मंदिर व परिसरात कर्नाटक येथील साईभक्त बसवराज आंमली यांच्या कडून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच शनिशिंगणापूर येथील दानशूर डेकोरेटेड यांच्याकडून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तसेच श्री साईबाबा मंदिर परिसरातील गेट नंबर चार समोर साई भक्तांच्या मागणीनुसार श्री सद्गुरू साईबाबांना गुरुपौर्णिमेनिमित्त वस्त्र व देणगी देण्याची मागणी साईभक्तांची होती त्यानुसार श्री साईबाबा संस्थानने प्रवेशद्वार चार समोर देणगी काउंटर सुरू केले आहे , त्यामुळे साईभक्तांना येथे गुरुपौर्णिमेनिमित्त दान देण्यास आता सुविधा निर्माण झाली आहे.
close