गुरूपौर्णिमेनिमित्त श्री साई संस्थानच्या रक्तदान शिबिराला साईभक्तांचा मोठा प्रतिसाद ..!!
सावळीविहीर(राजकुमारगडकरी):
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था वतीने श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री साईआश्रम येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते, या भव्य रक्तदान शिबीराचे उदघाटन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता गरजु रुग्णांसाठी रक्तांची निकड लक्षात घेऊन रक्तदान हे सर्वश्रेष्ठ व पवित्र दान असल्याने श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुहुर्तावर श्री साईआश्रम येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात स्वतः संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी रक्तदान करुन आपला सहभाग नोंदविला. याप्रसंगी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, उप अभियंता रघुनाथ आहेर आदी उपस्थित होते. तसेच या शिबीरात संस्थानचे मुख्यलेखाधिकारी श्री.घोरपडे, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांच्यासह शिर्डी ग्रामस्थ व संस्थानच्या विविध विभागातील कर्मचा-यांनी रक्तदान केले. रक्तदान करणा-या सर्व रक्तदात्यांना संस्थानच्या वतीने प्रमाणपत्र व ब्लड डोनरकार्ड देण्यात आले. सदर शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ.विजय नरोडे, वैद्यकीय अधिक्षीका डॉ.मैथिली पितांबरे व रुग्णालयाचे परिचारीका व परिचारक आणि कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले. श्री साईबाबा संस्थानने आवाहन केल्यानंतर श्री साईबाबा संस्थान चा या रक्तदान शिबिरात साईभक्तांनी तसेच संस्थांनच्या कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येने रक्तदान केले. गुरुपौर्णिमेनिमित्त साईभक्तांनी दान करण्यासाठी रक्तदान केले व आपल्या गुरूला रक्तदान देऊन दक्षिणा देत मनोमन समाधान मानले. शिर्डी करांनीही या शिबिरात रक्तदान करून मोठ्या संख्येने भाग घेतला.

