शिर्डी : अन्याय अत्याचार निर्मूलन समिती या सामाजिक संघटनेच्या जिल्हातील कार्यकारणीत समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. रविंद्रदादा जाधव व अहमदनगर जिल्हा अध्यक्षा सौ.रमादेवी धिवर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व समितीचे अहमदनगर युवक जिल्हा अध्यक्ष निखिल भोसले यांच्या नेत्तृत्वाखाली शिर्डी शहर युवक अध्यक्ष पदी राहुल जाधव यांची निवड करण्यात आली असल्याचे नियुक्ती पत्र देवुन जबाबदारी निश्चित करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रम घेता येत नसल्याने ईमेलद्वारे नियुक्ती पत्र पाठविण्यात आले.
वरिष्ठांनी दिलेल्या जबाबदारीचे काम एकनिष्ठेने करणार असल्याचे शिर्डी शहर अध्यक्ष मा.आकाश जाधव यांनी सांगितले.
अन्याय व अत्याचारा विरोधामधे ज्यांना काम करण्याची इच्छा आहे अशांनी समितीच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन समिती युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष पारखे यांनी यावेळी सांगितले.

