आळंदी - सारेगमप लिट्ल चॅम्पसची विजेती व लाईव्ह शो करणारी कार्तिकी गायकवाड आता आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. कार्तिकी लवकरच विवाहबंधवनात अडकणार असून तिच्या साखरपुड्याची तारीख देखील ठरली आहे.
कार्तिकीच्या घरी नुकताच कांदेपोह्याचा म्हणजेच पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांच्या मित्राच्या मुलासोबत कार्तिकीचं लग्न ठरलं असून येत्या २६ जुलैला साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. रोनित पिसे असं कार्तिकीच्या होण्याऱ्या पतीचं नाव आहे. रोनित मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. यासंदर्भात कार्तिकी म्हणाली की, हे सगळं अचानक ठरलं. आमचं अरेंज मॅरेज असून वडिलांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

