हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.०६,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथील भाजपाचे माजी जि.प.सदस्य ओमप्रकाश देशमुख यांनी आज दि.०६ जुलै रोजी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह गुजरात राज्याचे काँग्रेस प्रभारी तथा खासदार अँड.राजीव सातव यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने भाजपाला धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
सेनगांव तालुक्यातील वजनदार नेते असलेले शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य ओमप्रकाश देशमुख यांनी २०१७ च्या जि.प.व पं.स.निवडणुकीच्या वेळी भाजपा नेत्या पकंजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला होता.ओमप्रकाश देशमुख यांची सेनगांव तालुक्यात ब-यापैकी पकड आहे. देशमुख यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह गुजरात राज्याचे प्रभारी तथा खासदार अँड. राजीव सातव यांच्या कळमनुरी येथील निवासस्थानी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश घेतला. यावेळी खा.अँँड.राजीव सातव,सेनगांव तालुकाध्यक्ष विनायकराव देशमुख यांची उपस्थिती होती. माजी जि.प.सदस्य ओमप्रकाश देशमुख यांच्यासह सुरेश मुंदडा,सारंगधर देशमुख,यासिन पठाण,शालीक देशमुख, माजिद पठाण,संतोष तिडके, संजय देशमुख, प्रविण लांडगे,गजानन बोरकर, कान्होजी फटागंळे,निखिल देशमुख,मिथुन देशमुख,कृष्णा देशमुख, योगेश देशमुख,आकाश देशमुख,गोंविद देशमुख,आबांदास मिरगे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतला.यावेळी खा.राजीव सातव यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन ओमप्रकाश देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

