shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिगवण येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे कार्य प्रगतीपथावर - लवकरच येथील नागरिकांची होणार सोय-उपसभापती इंदापूर श्री संजय देहाड..!

भिगवण येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे कार्य प्रगतीपथावर - लवकरच येथील नागरिकांची होणार सोय- उपसभापती इंदापूर श्री संजय देहाड..!!

इंदापूर । प्रतिनिधी:
(तात्याराम पवार)

भिगवण (तालुका इंदापूर) भिगवन परिसरात कोरोनाच्या पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील रुग्णांना उपचारासाठी इंदापूर, बारामती व पुणे येथे जावे लागत आहे. यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय होत असून. भिगवण येथे कोविड केअर सेंटर सुरू करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी व इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे यांनी निवेदनाद्वारे केली होती .या सर्व गोष्टींची दखल घेत व नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी येथील कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
भिगवण हे गाव पुणे – सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळें येथून पुणे, मुंबई व इतर ठिकाणी मासे व भाजीपाला यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते . त्यामुळे भिगवणला कोरोनाचा धोका जास्त आहे. आज अखेर भिगवण व भिगवण स्टेशन येथे कोरोना रुग्णांची संख्या १२ आहे. तर मदनवाडी भागात ३व अकोले येथे १० रुग्ण आढळून आले आहेत. तसेच शंभर पेक्षा जास्त व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. येथील रुग्णांवर इंदापूर व बारामती येथे उपचार करण्यात येत आहेत. यामुळे येथील लोकांसाठी त्यांच्या गैरसोयीचे होत आहे. तसेच नातेवाईकांशी संपर्क होत नाहीत.
भिगवण येथे ट्रामा केअर सेंटरची प्रशस्त इमारत बांधून तयार आहे. त्यामुळे भिगवण येथील ट्रामा केअर सेंटर च्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू करावे अशी मागणी येथील नागरिक व अनेक राजकीय पक्षांनी केली होती. या मागणीला यश येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात या ठिकाणी प्रांताधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.आज ( दी .२७)याठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चंदनशिवे यांनी भेट देऊन पाहणी केली.भिगवण येथील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी भिगवण येथे असलेल्या ट्रामा केअर सेंटर मध्येच सर्व सुविधांची पूर्तता करून येत्या काही दिवसातच भिगवण येथील कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे .
असे डॉ. सुरेखा पोळ, तालुका वैद्यकीय अधिकारी, इंदापूर यांनी यावेळी सांगितले
भिगवण परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रामा केअर सेंटर मध्येच कोविड केअर सेंटर सुरू करावे अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे केली होती. त्यामुळे याठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू झाल्यास या परिसरातील रुग्णांवर या ठिकाणी उपचार होणार असल्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही. आरोग्य विभागास पंचायत समितीच्या वतीने आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहोत.असे श्री संजय देहाडे – उपसभापतीपं.स.इंदापूर यांनी केले.या वेळी संजय देहाडे, पराग जाधव , सचिन बोगावत व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
close