हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि२७, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यां संदर्भात आज दि.२७ जुलै सोमवारी रोजी सकाळपासून काळ्या फीती लावून कामकाजात सहभाग नोंदवला मागण्यासंदर्भात निर्णय न झाल्यास पुढील महिन्यांमध्ये आंदोलन करण्याचा इशारा नगरपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतन रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करणे यासह इतर अनेक प्रलंबित मागण्यासंदर्भात शासनाकडून निर्णय होत नसल्यामुळे पालिका कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी काळ्या फीती लावून कामकाजात सहभाग नोंदवला या आंदोलनात मुख्याधिकारी श्री शैलेश फडसे,पंडितराव पांडे,प्रवीण देशमुख, जगन्नाथ दिनकर,विशाल जारे, कैलास बिडकर,आकाश देशमुख,शे फकीर मामु,परसराम कोकाटे,मिथुन सुतार,लक्ष्मण सुतार,बाळू सुतार,विनोद कांबळे,कांतराव गाढवे,आणि कपिल बुद्रुक यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते यासंदर्भात पालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले शासनाकडून या मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार न झाल्यास पुढील महिन्यातील ११ ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा पालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

