राहाता तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायतींची मुदत लवकरच संपणार! मात्र निवडणुका नाहीत! प्रशासन येणार..!!
सावळीविहीर(राजकुमार गडकरी):
अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील सुमारे 25 ग्रामपंचायतीची मुदत लवकरच संपत असून या ग्रामपंचायतीच्या निवडणूका कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी या ग्रामपंचायतीवर पालकमंत्र्यांच्या साह्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एखाद्या चांगल्या व्यक्तीची प्रशासक म्हणून या गावांमध्ये निवडणूका होईपर्यंत निवड करणार आहे. राहता तालुक्यातील सुमारे पंचवीस ग्रामपंचायती मुदत ही लवकरच संपत आहे. त्यामध्ये राहता तालुक्यातील ग्रां,प,भगवतीपुर ,ग्रामपंचायत बाभळेश्वर, ग्रामपंचायत लोणी बुद्रुक ,ग्रामपंचायत कोल्हार बुद्रुक, ग्रामपंचायत लोणी खुर्द व ग्रामपंचायत ममदापुर,या सहा ग्रामपंचायतीची मुदत 27 /8 /2020 रोजी संपत आहे.तर ग्रामपंचायत गोगलगाव, ग्रामपंचायत हनुमंतगाव, ग्रामपंचायत नांदूर ,ग्रामपंचायत पाथरे बुद्रुक ,ग्रामपंचायत तिसगाव, या पाच ग्रामपंचायतींची मुदत 28/ 8 /20 20 रोजी संपत आहे.तर ग्रामपंचायत आडगाव बुद्रुक, ग्रामपंचायत अस्तगाव ,ग्रामपंचायत एकुरखे, ग्रामपंचायत जळगाव, ग्रामपंचायत केलवड बुद्रुक, ग्रामपंचायत पिंपळवाडी, ग्रामपंचायत पिंपरी लोकाई, ग्रामपंचायत रामपूरवाडी, ग्रामपंचायत रांजणगाव खुर्द, ग्रामपंचायत वाळकी,या ग्रामपंचायतींची मुदत 8/9 /20 20 रोजी संपत आहे.तर ग्रामपंचायत सावळविहीर खुर्द,व ग्रामपंचायत शिंगवे या दोन ग्रामपंचायतींची मुदत 9/9/ 20 20 रोजी संपत आहे.त्याचप्रमाणे ग्रामपंचायत चंद्रपूर व ग्रामपंचायत हसनापूर या दोन ग्रामपंचायतींची मुदत 4 /11 /2020 ला संपत आहे.अशी माहिती राहताचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे व राहता पंचायत समितीचे उपसभापती ओमेश साहेबराव जपे यांनी पत्रकान्वये दिली आहे. या एकूण पंचवीस ग्रामपंचायतीची मुदत लवकरच संपणार असून या ग्रामपंचायतींच्या निवडणुका कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार पाहण्यासाठी शासनाने आदेश काढून या मुदत संपलेल्या गावांमध्ये चांगल्या व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने ह्या नियुक्ती करावयाच्या आहेत.आता त्यामुळे मुदत संपलेल्या गावांमध्ये आपली 7प्रशासक म्हणून ग्रामपंचायतीवर निवड व्हावी.म्हणून अनेकजण प्रयत्नशील आहेत.मात्र या नियुक्त्या कधी होतील याची अजून तारीख घोषित झालेली नाही.

