shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन सत्राचे आयोजन..!!

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन सत्राचे आयोजन..!!

शिर्डी प्रतिनिधी :
कु.किरण जाधव
 
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 जुलै 2020 रोजी जागतिक युवा कौशल्य दिना निमित्त ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन सत्रात कौशल्य विकास कोर्सेस व त्यातील संधी या विषयावर  आयटीआयचे गट निर्देशक गणेश हडतगुणे  यांनी सकाळी 11.30 ते 1 या वेळेत मोफत मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन सत्रामध्ये 67 उमेदवारांनी उपस्थिती नोंदवून त्याचा लाभ घेतला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता आयटीआय अहमदनगरचे प्राचार्य जहागिरदार सर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त वि.जा.मुकणे, सहायक आयुक्त तसेच रविकुमार म. पंतम, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अतुल मुळे, हिंमत टाकळकर, श्रीमती दिपाली मोढवे, श्रीमती चंद्रकला गिरवले यांनी परिश्रम घेतले.
close