लॉकडाऊन काळातील एक आगळावेगळा आदर्श विवाह सोहळा...!!
पुणे। प्रतिनिधी : वड्डाल वधु वर मंडळ संस्था स्थापन करून वडार समाजात सर्व सामान्य लोकांना एक मोफत सत्कार्य सुरू करून ...वधू वर विषय टेलिग्राम चॅनेल मार्फत हाताळले जातात ..
वडार समाजातील लग्न जुळवून देण्यास मोलाचे सहकार्य करणारे, भारतातील पहीले- वहिले अखिल वडार बोली साहित्य संमेलन घेण्यासाठी अपार कष्ट घेतले व वारंवार वधू-वर- सुचक मेळाव्याचे आयोजन करणारे... या समाजामध्ये असे मोठे योगदान ज्यांनी वडार समाजाला दिलं आहे ते....
मा. अशोक पवार ....
यांचे चिरंजीव आकाश यांचा विवाह सोहळा गुरूवार दि. ९ जुलै ल२०२० रोजी पुण्यात पार पडला आहे..
या दिव्यांग वर आकाश बाबत बोलायचं झालं तर तो जन्मत: अपंग आहे. दोन्ही पाय नाहीत पण...
या पटट्या ने आयुष्यात आपल्या अनेक अडचणी वर कशी मात करता येते ...?
हे जगाला दाखवून दिले आहे....
अपंगत्वावर मात करत त्यांने खुप वेगवेगळ्या कला अवगत केलेल्या आकाश म्हणजे भूतलावर एक अदभुत महाशक्ती आहे..
आकाश सुंदर गाणी गातो,
आपल्याला पाय नसलं म्हणून काय झाले......
केवळ हाताच्या जोरावर सिंहगड, शिवनेरी, राजमाची, पुरंदर किल्ला चढुन नवा विक्रम नोंदवला आहे,
अनेक मान्यवर व संस्थानी त्याला विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे... आणि BBA झालेला आकाश हा सध्या अॅमेझॉन कंपनी मध्ये चांगले हुद्द्यावर कार्यरत आहे. त्याला सुमारे ३५,०००/- रू. पगार मिळतो.
असा या अपंग तरूणाशी विवाह कोण करणार ..?? असा प्रश्न पडला असेल तर नक्कीच वेगळं सांगायला नको...पण ....
चांगले कामाचे व सत्कार्याचे फळ केव्हाही चांगलेच मिळते...!! याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्याचे वडील अशोक पवार यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला की लक्षात येते...
अशोक पवार हे लोकांना नेहमी सांगत असतात की, योग्य वयात मुला मुलींचे लग्न झाले पाहिजे, त्यासाठी काही तडजोड ही करावी लागते, ती तयारी असेल तर मुला/मुलींचे विवाह योग्य वयातच लग्न होण्यासाठी वेळ लागत नाही.
हे त्यांनी आपल्या सर्वांना दाखवून दिले आहे. (जगा सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण असे न करता, प्रत्यक्ष कृती ते ही दिव्यांग मुलगा असताना)
त्यांनी त्यांच्या मुलाशी पंढरपूर येथील तुंगत गावाच्या वडार समाजातील मुलगी कु. नेहा शिंदे हिच्या घरातील लोकांनी तयारी दाखवली.
कु. नेहा ने १२ वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. आजकालच्या मुली सुंदर व सुदृढ, गलेलठ्ठ पगार, सरकारी नोकरी, छोटे कुटुंब अशा मुलांना पसंती देतात. परंतु या नेहाने तसे केले नाही. तिने दुरदृष्टी ठेवून आवडीपेक्षा चि. आकाशच्या मनाचा वेध घेऊन त्यास मोठ्या मनाने दाद दिली. या अशा तिच्या अप्रतिम विचाराला आमचा मानाचा सलाम !!!
तिने सुंदर रूपावर व शरीरावर न भाळता एका कर्तुत्वान समाजातील युवकांशी लग्नाला तयारी दाखवली.
आणि मा. अशोक पवार व आकाश यांच्या कर्तुत्वाला खरी दाद मिळाली....
या विवाह सोहळ्यामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते तो क्षण सर्वांसाठीच अविस्मरणीय असाच होता.
या नवदांपत्याला वडार पँथरचे प्रदेशाध्यक्ष मा. दयानंदजी इरकल, सामाजिक कार्यकर्ते मा. चंद्रकांत टिंगरे (स्थानिक नगरसेविका सौ. रेखाताई टिंगरे यांचे पती) तसेच मा. हरिषजी बंडीवडार, मा. हरिभाऊ कुसाळकर, मा. लक्ष्मण पवार, उद्योजक मा. विजय शिंदे इ. यांनी या विवाह सोहळ्यात उपस्थित राहून उभयंतांना भावी आयुष्यातील उज्वल कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

