shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महापालिकेचा हलगर्जीपणा, उघड्यावर पी.पी.ई किट टाकणाऱ्यांवर कारवाई करा – विशाल कसबे..!!

महापालिकेचा हलगर्जीपणा, उघड्यावर पी.पी.ई किट टाकणाऱ्यांवर कारवाई करा – विशाल कसबे
 July 14, 2020

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा समोर आलाय. काल उघड्यावर पडलेले पी.पी.ई किट आढळले होते. त्या प्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल कसबे यांनी केली आहे.

पिंपरीतील भाटनगर येथिल पत्राशेड लगत सर्वधर्मीय स्मशान भूमी आहे. या स्मशानभूमीत सध्या कोरोना रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्काराची जबाबदारी महानगरपालिकेच्या वैद्यकीय कर्मचारी यांची आहे. हे कर्मचारी स्वतःच्या सुरक्षितेसाठी हे कीट वापरात व नंतर त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जाते. परंतु ह्या लोकांकडून असे उघड्यावर पी.पी.ई किट टाकले जाते. याची माहिती मिळताच विशाल कसबे आणि मातंग एकता आंदोलन युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहराचे सहसचिव मछिंद्र वाघमारे व शहर सरचिटणीस वीरेंद्र चांदणे यांनी सोबत जाऊन पाहणी केली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

याच स्मशानभूमीच्या बाजूला दाट लोकवस्ती आहे. तिथे लोकांचा वावर असतो व काही जनावरे या कीटच्या संपर्कात आल्यास मोठ्या प्रमाणावर धोका वाढू शकतो. दरम्यान याप्रकरणी ज्या कुणी हे किट सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर टाकून दिले असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि भविष्यात असा कोणताही प्रकार होणार नाही याची सक्त ताकीद कर्मचाऱ्यांना द्यावी अशी मागणी विचार कसबे यांनी केली आहे.
close