shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"दिलासादायक : पिंपरी चिंचवडमध्ये आजपर्यंत ५०५२ रूग्ण ‘कोरोनामुक्त"

दिलासादायक : पिंपरी चिंचवडमध्ये आजपर्यंत ५०५२ रूग्ण ‘कोरोनामुक्त ..!!
July 15, 2020In: 

पिंपरी :- एकीकडे कोरोनाचा कहर पिंपरी चिंचवड शहरात सुरू असताना मोठा दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. शहरात आजपर्यंत तब्बल ५०५२ रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाले असून त्यांना ‘डिस्चार्ज’ देण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वॉररूमकडून आज (दि.१५) दुपारी १२ वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरात आजपर्यंत ८ हजार ३५५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील ५०५२ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान १३६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या ३१६६ ॲक्टिव रूग्ण शहरात असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे महापालिकेचे वायसीएम रुग्णालय चिमुरड्यांसाठी वरदान ठरले आहे. आजपर्यंत १७५ कोरोनाबाधित बालकांवर येथे यशस्वी उपचार करण्यात आला असून शून्य टक्के बालकांचा मृत्यू असलेले पिंपरी चिंचवड राज्यात एकमेव ठरले आहे.
close