shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजलगांवमध्ये पाच हजाराची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात .....!!!

केज   ।  प्रतिनिधी    ( प्रकाश मुंडे) :-
जमिनीच्या सातबाऱ्यावर फेरफार करून खाते खोड करुन  सही करण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले . या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .

 तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथील शिवारातील एका शेतकऱ्याच्या जमिनीची खातेखोड करण्यासाठी तलाठी अनिल भीमराव जाधव याच्याकडे रितसर अर्ज केल्यानंतर या जमिनीच्या सातबाऱ्यावर  फेरफार करून खातेखोडवर सही करण्यासाठी पाच हजाराची लाच मागितली . मात्र तक्रारदाराची पैसे देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड या कार्यालयात तक्रार दिल्यानंतर लाचेची प्राथमिक तपासणी केल्यानंतर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाच हजाराची लाच घेता तलाठी अनिल भिमराव जाधव यांना रंगेहात पकडले . सदरील या आरोपीविरूध्द माजलगांव पोलिसात दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .
close