shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या आणखी एका नगरसेवकाचा कोरोनाने घेतला बळी.:नगरसेवक जावेद शेख यांचे निधन..!!


पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक जावेद शेख यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दत्ता सानेे यांच्या पाठोपाठ जावेद शेख यांच्या निधनामुळं राष्ट्रवादीला दुसरा मोठा धक्का बसला आहे.


लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदत, प्रभागातील सोसायटीमध्ये औषध फवारणी करण्यासाठी व प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी जावेद शेख हे सातत्यानं कार्यरत होते. याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना आकुर्डीतील स्टार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने बुधवारी रात्री तातडीनं पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना श्वास घेण्याचाही त्रास होत होता तिथं त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना यश आलं नाही. त्यांनी आज सायंकाळी पाच वाजता अखेरचा श्वास घेतला.
close