shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आता रवींद्र ठाकरे..!!

सावळीविहीर (प्रतिनिधी ):
आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी अतिरिक्त कार्यभार सध्याचे साई संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे दिनांक 31 जुलै 20 20 पासून सोपवण्यात आला आहे. तसे आदेश शासनाच्या विधी व न्याय खात्याने एका पत्रकान्वये दिले आहेत.



शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी (आयपीएस) यांची नुकतीच मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. त्यांनी आपला पदभार  तेव्हाच सोडला आहे. 

त्यांच्या जागेवर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शासनाने दिनांक 24 /7 /2020  रोजी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब बाळकृष्ण घोरपडे यांची  नियुक्ती केली होती.  त्यानंतर श्री साईबाबा संस्थान चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांना त्यांची येथील| या पदावरील  तीन वर्षाची मुदत संपल्यामुळे त्यांना परत येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्यात आली आहे व रवींद्र ठाकरे यांच्याकडे आता श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या आयपीएस मुख्य कार्यकारी अधिकारी यांची जोपर्यंत नियुक्ती होत नाही  किंवा शासन पुढील आदेश काढेपर्यंत श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रवींद्र ठाकरे यांच्याकडे दिनांक 31 जुलै 20 20 रोजी पासून अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.त्यामुळे शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आता बाबासाहेब बाळकृष्ण घोरपडे यांच्या ऐवजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 31/ 7 /20 20 पासून  कार्यरत राहतील, असे या विधी व न्याय खात्याने काढलेल्या शासकीय परिपत्रकात म्हटले आहे.
close