कोरोनामुळे या वर्षीचा महंत गंगागिरी महाराजांचा १७३वा अखंड हरिनाम सप्ताह सरला बेट येथे साध्या पध्दतीने होणार..!!
सावळीविहीर (प्रतिनिधी):
महाराष्ट्रात सर्वात मोठा धार्मिक असा महंत गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे अगदी साध्या पद्धतीने परंतु खंड पडू न देता सरला बेट येथेच सर्व अटी व शर्ती सांभाळत करून होणार आहे. यावर्षी शासनाच्या आदेशाप्रमाणे हा हरिनाम सप्ताह मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत होणार असून या हरिनाम सप्ताहा मध्ये भाविकांनी गर्दी करू नये. आपल्या घरात राहूनच सप्ताहाचाआनंद घ्यावा.असे आवाहनही सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी केले आहे.
सदगुरु गंगागिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह १७३ वा नियोजना संदर्भात बैठक सरला बेट येथे मठाधिपती मंहत रामगिरी महाराज यांच्या उपस्थित नुकतीच संपन्न झाली.याप्रसंगी आ.रमेशराव बोरणारे सर,कडुभाऊ काळे, बाळासाहेब कापसे,बाबासाहेब चिडे,किशोर आण्णा थोरात ,संदिपशेठ पारख, कमलाकर कोते, मधु महाराज कडलग,सोमनाथ महाले, अनिल पवार, श्रीरामपूर तहसीलदार व अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मंहत रामगिरी महाराज यांनी सांगितले की ,आपल्या वर मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे संकट आले असुन यामध्ये शासनाने योग्य पध्दतीने पावले उचलली आहेत. शासकीय आदेशाचे पालन करून यावर्षी चा १७३ अंखड हरीनाम सप्ताह ची परंपरा फक्त पन्नास भाविकांच्या उपस्थितीत सरला बेटांवर पार पडेल.
या सप्ताह संदर्भातला १६ जुलै रोजी प्रातिनिधिक स्वरूपात पुणतांबे येथे नारळ देण्यात येईल, तसेच इतर सर्व कार्यक्रम पाच भाविकांच्या उपस्थित पार पडेल. कोणत्याही भाविकांनी बेटांवर येऊ नये. घरीच राहून सप्ताहाचा आंनद घ्यावा, यासाठी टी.व्ही व मोबाईलवर थेट प्रेक्षपण करण्यात येईल. प्रशासनाचे वतीने गोदावरी नदीच्या पुलावर पोलीस बदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना वैजापूर किंवा श्रीरामपूर तालुक्यातून सरला बेटला यायला मनाई राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी श्रद्धा ठेवून आपल्या घरीच सप्ताहाचा आनंद घ्यावा. असे मंहत रामगिरी महाराज यांनी म्हटले आहे. याबाबत आणखी मंहत रामगिरी महाराज 16 जुलै 20 20 रोजी पुणतांबे येथे सविस्तर माहिती देणार आहे व या अखंड हरिनाम सप्ताहाचा नारळही अधिकृतपणे ते घोषित करणार आहेत. हा सप्ताह फक्त पन्नास लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. तर इतर कार्यक्रम फक्त पाच भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे .असे या बैठकीत ठरले आहे.

