सावळीविहीर (प्रतिनिधी)
राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे कोरोणाचा शिरकाव झाला असून येथील लक्ष्मीवाडीच्या सोमैय्या नगरमध्ये 42 वर्षीय महिला चा रिपोर्ट कोरोनाबाधित आल्याचे आज दुपारी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सावळीविहीर बु।। मध्ये प्रथमच कोरोणा बाधित रुग्ण आढळला असून येथे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यामुळे सावळिविहीर गावात 14 दिवस लॉकडाऊन करण्यात आला असून मेडिकल व दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील सोमैय्यानगर मध्ये राहणारी एक 42 वर्ष महिलेचा अहवाल कोरोणा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सोमैय्यानगर येथील ही महिला वास्तव्यास असणारा परिसर सील करण्यात आला आहे .
त्याच प्रमाणे या कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कात आलेल्या एकूण सात लोकांना साईबाबा संस्थानच्या साईआश्रम फेज टू मधील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, हे सर्व त्यांच्या कुटुंबातील आहेत. त्यांचे श्राव अहमदनगर जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत .त्याच प्रमाणे अजून या कोरोणा बाधित महिलेच्या संपर्कात कोण कोण आले आहेत! त्यांचाही शोध सुरू आहे. दरम्यान सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीधर गागरे, डॉक्टर शेळके व त्यांचे वैद्यकीय पथक या सोमैयानगर भागात वास्तव्यात असणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत .आतापर्यंत सावळीविहीर बुद्रुक मध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नव्हता, मात्र आज दुपारी येथील 42 वर्ष महिलाचा रिपोर्ट कोरोणा पॉझिटिव्ह आल्यामुळे सावळीविहीर बुद्रुक येथे मोठी खळबळ उडाली आहे .दरम्यान सावळीविहीर बुद्रुक येथील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र नागरिकांनी विनाकारण फिरू नये, गर्दी करू नये,.सोशल डिंस्टन्स पाळावेत. मास्क वापरावेत. सावळविहीर येथे कोरोणा बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे 14 दिवस सर्व गाव लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे फक्त दवाखाना व मेडिकल ह्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने 14 दिवस बंद राहणार आहेत. याचे सर्वांनी पालन करावे .अन्यथा पालन न करणाऱ्या दुकानदार व व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी कोरोना संदर्भातील अटी व शर्तींचे पालन येथिल दुकानदार व नागरिकांनी करावे ,असे आवाहान शासनामार्फत व ग्रामसेवक रावसाहेब खर्डे, कामगार तलाठी गायके , सरपंच सौ. रुपाली आगलावे व पोलीस पाटील सौ.,संगीता वाघमारे या कोरोना समितीतील सदस्यांनी केले आहे.

