shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव तालुक्यातील कापडशिंगि येथें अवैध दारू विक्री संदर्भात महिलां रणरागिनीचां एल्गार


हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१६,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील मौजे कापडसिंगी येथे दारू बंदी साठी महिलांचा एल्गार, कापडसिंगी येथे मागील ३ वर्षा पूर्वी राष्ट्रीय समाज पक्ष व महिलांच्या वतीने दारू बंद करण्यात आली होती,सलग दोन वर्षे गावात दारू भेटत नव्हती, पण जिल्हा परिषद निवडणुकीनंतर गावात पुन्हा दारू सुरू झाल्याने हि अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी महिला सरसावल्या आहेत. 


त्या वेळचे सेनगांव पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक फुलझळके यांनी गावात येऊन दारू बंदी समिती स्थापन करून ग्रामपंचायत द्वारे दारूबंदी चा ठराव मंजूर करून घेतला होता, पण त्यांची बदली होताच गावात पुन्हा दारू सुरू झाली, पार्सल द्वारे साखरा येथील देशी दारू दुकानामधुन दारू चे बाॅक्स पार्सल बाॅय घेऊन येत आहेत.गावात सद्यस्थितीत २० जण खुलेआम पणे दारू विक्री करीत आहेत, हात भट्टी, गावठी दारू पिऊन गावकरी, युवावर्ग दारुच्या आहारी जाऊन गोंधळ घालत असल्याने गांवात दिवसेंदिवस भांडण तोट्यात वाढ होतआहे.तसेच सध्या कोरोना संकटामुळे गावात बाहेरील गावातुन, तसेच हा भाग वाशीम-बुलढाणा सिमेवर असल्याने त्या भागातील मद्यशौंकीन गावात रोज दारू पिण्यासाठी येत आहेत त्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, याबाबत पोलीस स्टेशन सेनगांव येथे कळविले असता त्यांनी याबाबत लक्ष दिले नाही, यामुळे दारू विक्रेत्यांचे मनोबल वाढले असून ते दारू बंद करणार्या महिलांना त्रास देत आहेत, तसेच दारू पिणारे त्यांना शिवीगाळ करत आहेत, यामुळे गावात तंटे वाढत आहेत, यामुळे दि.१५ जुलै बुधवार रोजी माजी जि प सदस्य चंद्रकांत हराळ, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत बर्वे,सरपंच लक्ष्मणराव हराळ, राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडी चे जिल्हा अध्यक्ष संतोष हराळ, पंचायत समिती सदस्य दशरथ साबळे, नंदकुमार पाटील, यांनी पुढाकार घेऊन गावात मिटींग घेऊन महिलांनी गावात दारू विक्री करणार्या लोकांना समज देऊन येत्या २ दिवसात दारू विक्री बंद न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला, यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, यावेळी यशोदाबाई गडदे , लक्ष्मीबाई कोकाटे, चंद्रभागा गायकवाड, पंचाबाई देवकाते, बर्वे बाई, साबळे, तनपुरे आदी १०० महिला रणरागिंनी या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत
close