shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पत्रकारांची निवड करा ...अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची मागणी

हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१६,मंत्रिमंडळाच्या ठरावानुसार राज्यपाल यांनी २०२० च्या महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०नुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीमधे अधिकारी प्रशासक न ठेवता गावातील नागरिकांची प्रशासक म्हुणन नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत मात्र गावातील नागरिक प्रशासक नियुक्ती करतांना स्थानिक पत्रकाराला संधी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहें . पत्रकार हा सर्वांना सोबत घेऊन चालणार लोकशाही चा ४था आधारस्तंभ आहें या करिता त्याच गावातील स्थानिक पत्रकारावर ग्रामपंचायतच्या प्रशासक पदाची जबाबदारी सोपवली तर गावच्या विकासाच्यासाठी महत्त्वाचे  ठरू शकते.
          

नियुक्ती होणारे अधिकारी प्रशासक असलेले ग्रामपंचायतवर स्थानिक  पत्रकारांना प्रशासकाची संधी देण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने ,राष्ट्रीय सरचिटणीस  सुरेश सवले , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख व हिंगोली येथील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे  जिल्हाध्यक्ष गोपालराव सरनायक यांनी आज मा .मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व ना. यशोमती ठाकूर,पालकमंञी वर्षाताई गायकवाड ,हिंगोलीचे जिल्हाधिकारी,  जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व सर्व पंचायत समितीचे  गटविकास अधिकारी या सर्वांना ईमेल द्वारे निवेदन देण्यात आले असुन पञकाराना ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती करावी अशी मागणी  अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष  गोपालराव सरनायक यांनी केली असुन या निवेदनावर संघटनेच्या पदाधिकार्याच्या स्वाक्षरी आहेत ..
close