shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोक्का’च्या गुन्ह्यातील ५ कैदी येरवडा कारागृहातून फरार..!!

मोक्का’च्या गुन्ह्यातील ५ कैदी येरवडा कारागृहातून फरार..!!

July 16, 2020 पिंपरी-चिंचवड, पुणे:- कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील येरवडा कारागृहातील काही कैदी शासनाच्या आदेशानुसार तात्पुरत्या इमारतीमध्ये हलवण्यात आले आहेत. यामधील ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील पाच कैदी आज फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

देवगण अजिनाथ चव्हाण (रा. दौंड, पुणे), गणेश अजिनाथ चव्हाण (रा. दौंड, पुणे), अक्षय कोंडक्या चव्हाण (रा.दौंड, पुणे), अजिंक्य उत्तम कांबळे (रा.सहकारनगर, पुणे), सनी टायरन पिंटो (रा. काळेवाडी,पुणे) अशी फरार झालेल्या कैद्यांची नावं आहेत.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील काही कैद्यांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या इमारतीमध्ये हलवण्यात आले होते. यातील अजिंक्य कांबळे, उत्तम कांबळे, सनी पिंटो, देवगण चव्हाण आणि अजिनाथ चव्हाण हे पाच आरोपी मोक्याच्या गुन्ह्यातील आहेत. हे पाच जण इमारतीच्या खिडकीचा गज कापून मध्यरात्रीच्या सुमारास पळून गेले आहेत. ही घटना काही वेळेतच लक्षात येताच आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली असून, या पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे येरवडा पोलिसानी सांगितले.
close