हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि. ०४,कोरोना व्हायरस व लॉकडाऊनमुळे सध्या विवाह सोहळे अत्यंत मोजक्या वर्हाडी मंडळीच्या उपस्थित संपन्न होत असल्याचे चित्र संपुर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. या विवाह सोहळ्यामुळे नाहक होणार्या खर्चाला आळा बसला आहे. यामुळे वर व वधुपित्यांना कांही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.हिंगोली जिल्ह्यातील सेनगावचे प्रतिष्ठीत व्यापारी शामसुंदर सारडा व परळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बालकिशन सोनी परिवाराचा असाच एक आगळा-वेगळा विवाह सोहळा अत्यंत साध्या पध्दतीत पार पडला.
या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.परळी येथील बालकिशन सोनी यांचे सुपुत्र अजितकुमार व श्यामसुंदरजी सारडा यांची सुपूत्री सविता यांचा विवाह सोहळा मंळवार दि.30 जून 2020 रोजी संत नामदेव कृषी बाजार, सेनगाव जिल्हा हिंगोली येथे अत्यंत साध्या पध्दतीत व नाहक होणार्या खर्चाला फाटा देत संपन्न झाला. मारवाडी समाजात लग्न सोहळा म्हटले की प्रचंड थाटामाटात, मोठा खर्च करण्याची पध्दत रूढ आहे. परंतू सोनी व सारडा परिवाराच्या वतीने अनेक परंपरांना फाटा देत पार पडलेल्या या विवाह सोहळ्याची चर्चा होत आहे. या आदर्श विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. या विवाहासाठी खास उपस्थित असलेले श्री ओंकारनाथ मालपाणी महाराष्ट्र सेवानिधी संगमनेर चे कार्याध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांचा सत्कार सोनी परिवाराच्या वतीने करण्यात आला.
हा विवाह सोहळा पार पाडण्यासाठी सोनी पविाराच्या वतीने श्रीरामजी सोनी, पांडुरंग सोनी, नगरसेवक राजेंद्र सोनी, उद्योजक अनिल झंवर,सीए सोमेश्वर आसावा, संपादक भगिरथ बद्दर तर सारडा परिवारच्या वतीने द्वारकादासजी सारडा, केदारजी सारडा, रमेशजी सारडा, प्रमोद सारडा, जगदीश सारडा, बद्रिनारायण सारडा आदीनी परिश्रम घेतले.

