लहानपणी गावात कुणाच्या घरी काही कारणाने गेलो कि वडीलधाऱ्या माणसंच पहिला प्रश्न असायचा कुणाचा तू , लगेच तत्परतेने उत्तर देत मी ना गणपत परकाळे यांचा, मग त्याला जोडून दुसरा प्रश्न समोरून यायचा वरच्या कि खालच्या मग मात्र कळायचे नाही .हे असं का विचारतात .आपल्या वडिलांच्या नावाचे कुणीतरी दुसरे पण आहे हे त्यामागचे कारण असायचे . मी आपला गप्प ज्या कामासाठी गेलो त्यावर लक्ष केंद्रित करायचो . अंकल यांचा जन्मं ०५/०९/१९५९ रोजी वडील नामदेवराव व आई यमुनाबाई यांच्या पोटी झाला. आपल्या वडिलांचे ते धाकटे पुत्र थोरले बंधू हौसराव उर्फ दादासाहेब ( आण्णा) तर मधवे बंधू एकनाथराव ( नाना) यांचे हि अंकल हे लाडकेच,तस पहिले तर आपल्या पेक्षा जेष्ठ बंधुंना आओ जाओ बोलण्याची पद्धत सर्रास रूढ आहे परंतु या दोन्ही भावांनी अंकल हे आपल्या पेक्षा लहान असूनही कधी एकेरी अथवा आर तुरे असं बोलले मी तरी कधी. पहिले किंवा ऐकल्याचं नाही. ते नेहमी मोठे असूनही अंकल याना आओ ,जाओ बोलतात आपल्याही पेक्षा लहान भावाला समाजामध्ये इतका मान देणारे बंधू समाजात आपल्याला कवचितच दिसतात. अंकल यांच्या वडिलांना नामजी (भाऊ) पाटील म्हणत. गावात कारभारी हि होते.राजकारण अन समाजकारणचे बाळकडु त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले . अंकल यांच्या वडिलांच्या उमेदीच्या काळात त्यांनी लोकांच्या हाताला काम दिले, जुने वाद, मिटवणे, निवाडे असतील तर ते निपक्ष पणे करणे,लोकांना अडचणीच्या काळात मदत हि करायला ते मागे पुढे बघत नव्हते.
आदर्श युवा आयडॉल, मन मिळाऊ. परखड, सर्वसामावेशक कार्यकर्त्यांचे एक प्रतीक म्हणजे, खरेदी विक्री संघाचे माझी संचालक श्री. गणपतराव परकाळे (अंकल ) एका सामान्य कुटुंबातील धडाडीचा कार्यकर्ता ,सामाजिक , शैक्षणिक, क्षेत्रात आदर्श व्यक्तिमत्व विशेष म्हणजे आपल्या मताशी ठाम एकनिष्ठ , चळवळीचा कार्यकर्ता म्हुणुन त्यांची श्रीगोंदा तालुका सह अहमदनगर जिल्ह्यात ओळख आहे. अंकल यांच्या जडण घडणीत त्यांची सहचारिणी त्यांच्या सुख दुःखात पावलो पावली साथ देणारी आमची माउली सौ उज्जवलामाई , अंकल याना यांचीहि साथ लाभली, त्यामुळेच अंकल यांचा आजपर्यत जीवनरूपी प्रवास अधिक सुखकर झाला पांढऱ्या कलरचा मॅटेडो लांबुन जरी दिसला तरी लोक म्हणायची आले अंकल. आपलंही सुंदर घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते . २५ ते ३० वर्षापुर्वी ग्रामीण भागातही सुंदर बंगला बांधून लोकांनाही म्हणत उंच राहणीमान फक्त शहरी लोकच नाही तर आपणही हे करू शकतो. आज त्याची प्रचिती आलीय आज ग्रामीण भागात सुंदर बंगले लोकांनी बांधलेले आपल्याला दिसतात . अंकल यांच्या बंगल्याच्या हॉल मध्ये त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी ,राजीव गांधी. इंदिरा गांधी.अश्या अनेक महान व्यक्तींचे फोटो दर्शनी भागात लावलेले.- प्रशासनात अंकल यांच्या शब्धाला फार मोठी किंमत आहे. हे मी अगदी जवळून पहिले आहे - एखाद्या माणसाविषयी तर्क लावून सांगू शकत नाही तो कसा आहे,जशे वाचल्या शिवाय पुस्तक अन जवळ गेल्याशिवाय किंवा त्या माणसाच्या सानिध्यात राहिल्याशिवाय माणूसहि कळत नाही. माझे भाग्य असे कि मला अंकल यांच्या सानिध्यात लहानपणापासून राहण्याचे भाग्य मिळाले, त्यांचे राजकारण अन समाजकारण जवळून पाहता आले. मला ते नेहमी म्हणत विरोधाला विरोध म्हणून कधी राजकारण करायचे नाही. माझ्या माहितीनुसार अंकल हे स्वर्गीय सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे बापू याच्या राजकीय विचारांशी एकनिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांचे कार्य पाहून एक होतकरू तरुणाला काँग्रेस पक्षाने श्रीगोंदा तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यांनीहि पदाला साजेशी कामगिरी त्यावेळी केल्यामूळे अंकल यांचे नाव तालुकासह अहमदनगर जिल्ह्यात झाले. बऱ्याच वर्षांनी राजकीय विचाराशी फारकत घेत त्यांनी माझी मंत्री मा.श्री.बबनराव पाचपुते (दादा) यांच्या विचाराशी एक संध होत समाजकारण अन राजकारण अग्रेसिव्ह भूमिका घेत समाजामध्ये आपल्या कामाचा ठसा कामाच्या माध्यमातून उमटविला. आता तस पहिले तर एकनिष्ठ हा शब्ध फक्त भाषणापुरता राहिला आहे. उगवत्या बरजाऊन मावळत्याला रामराम करणारी राजकारणी समाजात जास्त संख्येने झालेले दिसतील,आजही अंकल यांची ओळख एकनिष्ठ म्हणूनच घेतली जाते. तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक पक्षातील राजकीय नेते अन कार्यकर्त्यांशी अंकल यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, आपल्या अनुभव कौशल्य पणाला लावून त्यांनी गावातली अथवा शेजारील गावातील अनेक निवाडे निर्भीड पणे इथे निपक्ष पने केले अन करतात यात तिळमात्र शंका नाही. कारण अंकल यांच्या कितीही जवळचा माणूस असला तरी चुकीला चूक म्हण्याची धमक त्यांच्यात आहे. ते कधीही एकतर्फी निवाडा करत नाही.आता शंका काढायची म्हंटले तर आपण देवाला पण नाव ठेवतोच कि कौठा गावचे भूषण स्वर्गीय भाऊसाहेब पाटील शिपलकर व अंकल यांचे राजकीय मतभेद होते. पण मनभेद कधीच नव्हते. कट शहाच्या राजकारणात पदरी निराशा आली, तरी लढायचे सोडले नाही. या दोन्ही नेत्यांनी एक मेकांचा अनादर केलेला मी तरी पहिला नाही. मतदान नंतर दिलखुलास दाद देणारी राजकारणातील दोन राजहंस . दुसरे म्हणजे ते हलक्या कानाचे नाही,कुणी कळ केली त्यातील खरे व खोटे पणा तपासूनच निर्णय घेतात. मी असं म्हणू शकत नाही कि कोण्या एकाच्याच काळात विकासात्मक कामे झाली . परंतु असं मी नक्की म्हणेल या माणसाने स्वतःला जोखून देऊन विकासाची कामे केली. हे आपण नाकारू शकत नाही. प्रशासनात कामे करत असतांना अनेक वेळा कटू निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे कधी कधी आपल्या जवळची हि लोक धुखावली जाऊ शकतात , याची पूर्णपणे जाणीव असूनही लोकहितासाठी कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात, तेच त्यांनी हि घेतले. त्यांत त्यांचा कुठलाही स्वार्थ मला तरी दिसला नाही वर वर रागीट अन निर्भीड वाटणारे अंकल मनाने फार हळवे हि मला भासले घरातील माणसाच्या निधनाने डोळ्यात पाणी येणे किंवा दुःख होणे साहजिक आहे . पण आपल्या भावकीतील वयोवृद्धांचे निधन झाले तर या माणसाला मी डसाडसा रडताना हि पहिले.
गावात इतका चांगला बाजार भरू शकतो याची कल्पना हि केली नाही .त्यांच्या सह अनेक कार्यकर्त्यानी हि कल्पना सत्यात उतरवली. बाजारामुळे गावातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला . सर्व सामान्य कुटुंबातील लोकांचे चार पैसे वाचायला लागले. रिंग रोडचा प्रश्न निकाली काढला. गावातील गटार यॊजना, अंतर्गत रस्ते , फिल्टर पाणी योजना, निराधार योजना , सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्याला दिवसा आपल्या शेताला पाणी मिळावे म्हणून सौर उर्जेवर मोटार चालतील अशी योजना महाराष्ट्रातील पहिल्या योजनेला त्यांनी शासनाकडून परवानगी आणली आहे. गावात बँक पाहिजे हे स्वप्न त्यांनी पहिले युनियन बँकेची उपशाखा गावात सुरु केली गावातील छोट्यातील छोट्या मंदिराचे कामे पूर्ण केली . कौठा गावाला शासनाचा स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळविला. हागणदारी मुक्त कौठा योजना प्रभावी राबविली हे कोण्या एकट्या अंकल यांचे यश नसून सर्व ग्रामपंचायत सदश्य सरपंच, उपसरपंच व त्यांच्या सह सर्व सहकारी यांनी अंकल यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन विकासात्मक कामात स्वतःला जोखून दिले. टीम वर्क काय असते, अन त्यातून किती फायदा होऊ शकतो हे या सर्वानीच दाखवुन दिले , त्यामुळे गावातील लोकांना याचा फार मोठा फायदा झाला. शाळेत असताना १५ ऑगस्ट, २६ जानेवारी ला अंकल यांचे प्रोस्थान देणारे भाषण, भाषण देत असताना लोकांच्या हृदयाला साद घालत.
प्रभू श्री रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कौठा गावात , नाशिक येथील काळाराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यासाठी अंकल यांच्या सह अनेक कार्यकर्त्यानी कंबर कसली आहे.या मंदीराचे अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्यामुळे जबाबदारी मोठी आहे. या मंदिरासाठी ६ कोटीहून जास्त खर्च येणार आहे. या लेखाच्या माध्यमातून मी प्रभू श्री रामांच्या मंदिरासाठी भक्तांना विनंती करणार आहे कि आपण हि फुल ना फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत देऊन रीतसर पावती घेता येईल , अशी माहिती देवस्थानचे सन्मानीय सचिव श्री शिवाजीराव गवांडे (भाऊसाहेब) यांनी दिली l
शेवटी एवढेच हा लेख मी अंकल यांना न विचारता लिहला त्यामुळे त्यांची दिलगिरी व्यक्त करतो माझ्या अंतर्मनात डोकावून जे खरे आहे तेच लिहिले. यात माझा अथवा त्यांचा कोणताही स्वार्थ नाही. असा लेख लिहण्यासाठी माझ्या सर्व मित्रांनी माझे बंधू शिवाजी परकाळे यांनी प्रोस्थान दिले.माझी पोलीस प्रशिक्षक श्री. विलासराव खोल्लम साहेब यांच्याकडून प्रेरणा घेऊनच जमेल तसा एका ध्येयवेड्या व्यक्तिमत्वाचा लेखा जोखा आपल्यासमोर मांडताना आनंद होत आहे.
१९३७ साली प्रदर्शित प्रभात फिल्म कंपनीच्या "कुंकू " या चित्रपटातील हे गीत कवी शांताराम आठवले यांनी लिहिलेले असून संगीतकार श्री . केशवराव भोळे यांनी या गीताला चाल लावली होती .८२ वर्षापुर्वी लिहीलेले हे गीत
मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची तू चाल गड्या तुलारे भीती कुणाची परवा बी कुणाची
झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला काट ,कूट वाटमधी बोचती त्याला ,
रगात निघल तरीबी हसलं शाबास त्याची
मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची तू चाल गड्या तुलारे भीती कुणाची परवा बी कुणाची
अंकल यांच्या कार्याचे ठाव घेणारे गीत,गीताचे बोल जरी एकेरी असले तरी त्यांच्या प्रति नेहमी आदराची भावना जनसामान्यात आहे. हेच शाश्व्त सत्य आहे.
सुभाष परकाळे

