shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट - मुस्लिम जमात व खिदमत ए उम्मतच्या वतीने "फ्री मेडिकल चेकअँप कॅम्प" चा कार्यक्रम संपन्न**वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाल ह्यांच्या हस्ते "फ्री मेडिकल चेकअँप कॅम्प" चे उद्घाटन..!!

अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट - मुस्लिम जमात व खिदमत ए उम्मतच्या वतीने "फ्री मेडिकल चेकअँप कॅम्प" चा कार्यक्रम संपन्न

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाल ह्यांच्या हस्ते "फ्री मेडिकल चेकअँप कॅम्प" चे उद्घाटन..!!

अंबरनाथ (जाफर वणू):

अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट - मुस्लिम जमात अंबरनाथ तसेच खिदमत ए उम्मतच्या वतीने "हजरत गैबनशाह वली दर्गा परिसर कोहोजगांव" या ठिकाणी दि. 25 व 26 जुलै 2020 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत "फ्री मेडिकल चेकअँप कॅम्प" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अंबरनाथ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन धुमाल ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्यात नव्हेतर देशभरात धुमाकुळ घातलेल्या कोरोना व्हायरससारख्या रोगावर आळा घालण्याकरीता शासनाने लॉकडाउनचा मार्ग निवडला. परंतु अंबरनाथ शहरात कोरोना बांधितांची संख्या दिवसांदिवस वाढत आहे. त्याकरीता नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी यावेळी मालेगांवचा प्रसिद्ध मंसुरी काढ़ा अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आला. तसेच अंबरनाथ कोरोना मुक्त व्हावा या उद्देशाने मरहूम हाजी सलीम सय्यद यांच्या स्मृतित अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट - मुस्लिम जमात अंबरनाथ व खिदमत ए उम्मतच्या वतीने "हजरत गैबनशाह वली दर्गा परिसर कोहोजगांव" या ठिकाणी दोन दिवसीय "फ्री मेडिकल चेकअँप कॅम्प" चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मालेगांव हुन आलेले क्वालिफाइड डॉ.उस्मान सिद्धिकी व डॉ. अरशद अख्तर रियाज अहमद ह्यांनी नागरिकांची तपासणी करून त्यांना औषधही दिले. 

या कार्यक्रमाचे उद्देश्य नागरिकांना कोरोनापासून भयमुक्त करावा व जर कोणी कोरोना बांधित असल्यास त्यांना वेळेवर उपचार घेता येईल. अश्या अनेक छोठ्या मोठ्या गोष्ठी लक्षात घेत अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट - मुस्लिम जमात अंबरनाथ व खिदमत ए उम्मतच्यावतीने "फ्री मेडिकल चेकअँप कॅम्प" आणि मालेगांवचा प्रसिद्ध मंसुरी काढ़ा उपलब्ध आहे. तसेच या "फ्री मेडिकल चेकअँप कॅम्प" मध्ये हिन्दू मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कॅम्पचा लाभ घेतल्याचे जमातीचे सदर (अध्यक्ष) हाजी सलीम चौधरी ह्यांनी सांगितले.

यावेळी अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट - मुस्लिम जमात अध्यक्ष हाजी सलीम चौधरी, उपाध्यक्ष सिकंदर पटेल, कार्याध्यक्ष डॉ. जुबेर शाह, जनरल सेक्रेट्री हबीब सौदागर, जॉइंट सेक्रेट्री डॉ. जावेद शेख, खजिनदार मकबुल खान, इंटरनल ऑडिटर असलम खान, सिनियर ट्रस्टी आरिफ काझी, मोहम्मद खत्ताल शेख ह्यांच्यासह आदि ट्रस्टी मेंबर उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यास खिदमत ए उम्मत ट्रस्टचे समीर अब्दुल कादर शेख, समीर सिद्धिकी, मेहबूब शेख, जफ़र खान, मोहाफुज सय्यद, मुजमील शेख, सी. सय्यद ह्यांच्यासह आदींनी मेहनत घेतली.
close