शिर्डीच्या पवित्र भूमीतून अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनासाठी पवित्र माती, श्री साईतीर्थ व श्री साईविभूती यथोचित पूजा करून रवाना..!!
सावळीविहीर (प्रतिनिधी ):
शिर्डी या आंतरराष्ट्रीय साईबाबांच्या पवित्र तीर्थक्षेत्रातून आयोध्या येथे पाच ऑगस्ट रोजी होणाऱ्या श्रीराम जन्मभूमी मंदिर भूमिपूजनासाठी येथील पवित्र माती ,श्री साईंची विभूती व श्री साईंचे जल यांची विश्व हिंदू परिषद व श्रीराम भक्तांच्या वतीने यथोचित पूजा-अर्चा करून ती 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पाठविण्यात येणार आहे.
श्री राम जन्मभुमी अयोध्या येथे 5 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य अशा श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या मंदिराच्या भूमिपूजनासाठी वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्या वरून शिर्डी व राहता तालुक्यातील विश्व हिंदू परिषदेच्या वतीने व बजरंग दलाच्या वतीने श्रीराम भक्त व अयोध्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांकडून सर्व हिंदू समाजाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात येथे श्री
साईबाबांची पवित्र नगरीतील माती ,श्री साईबाबांचे जल व श्री साई बाबांची विभूती यांची वैभव रत्नपारखी व शेखर कुलकर्णी या गुरूंच्या मंत्रोच्चारात यथोचित पूजा करण्यात आली व या सर्व वस्तू मोठ्या भक्तिभावाने आयोध्या येथे 5 ऑगस्ट साठी पाठवण्यात येणार आहे.शिर्डीत हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या पूजनासाठी श्रीराम भक्त तसेच शिर्डी व राहता तालुक्यातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोणाच्या पार्श्वभूमिवर सर्व अटी व नियम पाळत हा कार्यक्रम घेण्यात आला, मंदिराच्या परिसरातील गेट बाहेर हा कार्यक्रम संपन्न झाला ,यावेळी श्रीराम जय श्रीराम ,पवनसुत हनुमान की जय ,अशा घोषणा देण्यात आल्या.

