shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दत्ता विघावे यांचा भारतातील मान्यवर संस्थांकडून गौरव..!!

दत्ता विघावे यांचा भारतातील मान्यवर संस्थांकडून गौरव

श्रीरामपूर : - संयुक्त राष्ट्रसंघाच्या बुध्दीजीवी गटाचे  ( युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल ) भारताचे सदस्य तथा वर्ल्ड कॉान्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशनचे ( डब्ल्यूसीपीए ) महाराष्ट्र ( श्रीरामपूर ) चॅप्टरचे अध्यक्ष व जेष्ठ क्रिकेट समिक्षक दत्ता विघावे यांचा भारतातील विविध सामाजिक संस्थानी ऑनलाईक पद्धतीने सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे.
                 सध्या जगभर  कोरोना व्हायरस (कोविड-१९ ) या महाभयंकर रोगाने थैमान घातले असून भारतातही या रोगाची मोठया प्रमाणात लागण झाली असून तिला रोखण्यासाठी समाजाच्या विविध स्तरातून प्रयत्न सुरू असून श्री. दत्ता विघावे हे             डब्ल्यूसीपीएच्या माध्यमातून समाजप्रबोधन व पिडीतांना साहाय्य करत आहेत.
                  त्यांच्या या कार्याची दखल घेत "जिविका फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे, अध्यक्ष राज तेलंग. यांनी "कोविड योद्धा अवॉर्ड "तायक्वांदो स्पोर्टस् असोशिएशन चर्खी दादरी ( चंदिगड ) हरियाणा, अध्यक्ष श्री. सुदेश वर्मा यांनी " सेवा योद्धा अवॉर्ड "तर महाराष्ट्र पत्रकार संघ ( ठाणे जिल्हा ) महाराष्ट्र अध्यक्ष श्री. विलासराव कोळेकर, व डॉ. श्री. शंकर ( राज ) परब, ठाणे जिल्हाध्यक्ष यांनी  " जागवली माणुसकी पुरस्कार २०२० " देऊन
 सन्मानित केले असून दत्ता विघावे यांचे समाजाच्या विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
close