अहमदनगर (प्रतिनिधी) | - नगर तालुक्यातील देहरे येथील आदेश रघुनाथ जगधने (वय 10) या शाळकरी मुलाचा देव नदीपात्रात पडून मृत्यू झाला. आज सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
मागिल आठवड्यात देहरे परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. त्यामुळे देव नदी पात्रात पाणी वाहु लागले आहे. अशातच सायंकाळी पाचच्या सुमारास आदेश हा त्याच्या लहान बहिणीबरोबर खेळण्यासाठी देव नदी परिसरात गेला होता. त्यावेळी त्याचा पाय घसरल्यामुळे नदीत पडला.
एका महिलेला ही घटना दिसल्यानंतर तिने आरडाओरड केल्याबरोबर या परिसरातील ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. ग्रामस्थ येईपर्यंत आदेशचा मृत्यू झाला होता. आदेशचा मृतदेह तेथील ग्रामस्थांनी पाण्यातून बाहेर काढले.
ऐन नागपंचमी सणाच्या दिवशीच अशी घटना घडल्यामुळे संपूर्ण देहरे गावात शोककळा पसरली आहे.