shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांवात कोरोनाचा शिरकाव,एका कापड विक्रेत्याला कोरोनाची लागण



हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख) 
दि. १४,हिंगोली जिल्हयातील सेनगांव शहरातील एका २५ वर्षीय कापड विक्रेत्याला कोरोनाची  लागण झाल्याचे आज दि.१४ जुलै मंगळवार रोजी आलेल्या अहवालात स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे.



सेनगांव शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील २५ वर्षीय कापड विक्रेत्याला ८ दिवसा अगोदर शुगरचा त्रास असल्यामुळे हिंगोली येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर  सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथील डाँक्टरांनी त्यांचा स्वँब तपासणीसाठी नांदेड येथे पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज दि.१४ जुलै मंगळवार रोजी प्राप्त झाला असुन त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न असुन त्या व्यक्तीच्या कुटुंबातील ३ जणासह कापड दुकानातील ५ कामगारांना काँरंटाईन करणार असल्याची माहीती सेनगांव ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाँ. सचिन राठोड यांनी दिली.
close