हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
हिंगोली दि.१४,सर्वसामान्य प्रमाणे नियम सर्वांना समान असल्याचे हिंगोली पोलिसांनी आज दि.१४ जुलै मंगळवार रोजी दाखवून दिले आहे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांची गाडी रॉंग साईट असल्याचे पाहून वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने दोनशे रुपये दंड आकारला गेला आहे.
या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा गाडी चालवत असतो तेव्हा त्याच्याकडे लायसन किंवा गाडीचे कागदपत्र असतात की नाही हे विचारले जाते शिवाय आता कोरोना सारख्या प्रार्दुभाव रोगाला रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने वेळेचे बंधन टाकले आहे या वेळे अतिरिक्त उलट पने फिरणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या वतीने कार्यवाही करण्यात येत आहे आज दुपारी इंदिरा गांधी चौक येथे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांची एम.एच.३८व्ही ४४९९ क्रमाकाची गाडी रॉंग साईड येत असल्याचे पाहून वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांनी गाडी थांबवू चौकशी केली व ऑनलाइन पद्धतीने गाडीच्या नेम प्लेट चा फोटो काढत दोनशे रुपये दंड आकारला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे या वाहतूक शाखेच्या दबंग कारवाईमुळे सर्वसामान्यांमध्ये मात्र एक प्रकारे समान कायद्याची भावना निर्माण झाली आहे ही कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या पथकाने केली आहे

