shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिंगोली जिल्ह्याची वाटचाल धोकादायक वळणाकडे 24 तासात 28 रूग्ण कोरोणा बाधीत..!!

हिंगोली जिल्ह्याची वाटचाल धोकादायक वळणाकडे 24 तासात 28 रूग्ण कोरोणा बाधीत..!!

दि. 14/7/2020
हिंगोली प्रतिनिधी (गजानन गिरे):
जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 28 रुग्ण सापडले.जिल्ह्यात 74 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांच्याकडून आज रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 28 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना केअर सेंटर्सचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे.

यामध्ये हिंगोली येथील पेन्शनपुरा, गोदावरी हॉटेलजवळ 1 रुग्ण आणि औंढा तालूक्यातील अंजनवाडी 1 रुग्ण जे सारीच्या आजाराने जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे भरती आहेत. हिंगोली तालूक्यातील पेडगांव येथील 11 रुग्ण, रामा देऊळगाव येथील 5 रुग्ण, पहेणी येथील 2 रुग्ण, माळधामणी येथील 1 रुग्ण आणि जयपूरवाडी येथील 1 रुग्ण तसेच सेनगाव येथील 1 रुग्ण, वसमत येथील सम्राट कॉलनी, स्टेशन रोड, आणि गणेशपेठ 5 रुग्ण असे एकुण 28 जणांना कोविड-19 ची लागण झाली आहे.
आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 4 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे. तसेच 2 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे 6 कोविड-19 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 361 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 287 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 74 रुग्णांवर उपचार चालू आहेत.
मुंबई ,पुणे येथुन मजुर येणे चालु असुन बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्यामुळे जनता प्रचंड दहशती खाली वावरत आहेत.
    दरम्यान हिंगोलीत 361 कोरोना पॉजिटिव रुग्ण झाले आहेत, त्या पैकी 287 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली तर आज घडीला 74 रुग्णावर उपचार सुरू आहेत त्यातील 6 जणांची प्रकृती चिंताजनक असून चार रुग्णांना ऑक्सीजन चालू आहे 2  रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बाय पंप मशीन वर ठेवण्यात आले आहे 
दिवसेंदिवस बाधितांच्या संकेत वाढ होत असल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
close