shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवीन विज कनेक्शन, सौर क्रुषी पंप, ट्रांसफार्मर संदर्भात शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन..!!

नवीन विज कनेक्शन, सौर क्रुषी पंप, ट्रांसफार्मर संदर्भात शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन..!!


संगमनेर। प्रतिनिधी : शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन,सौर कृषी पंप, ट्रांसफार्मर मिळण्यासाठी  येत असलेल्या अडचणींसाठी मा.ना.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब,
मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्याकडे शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

     याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन,सौर कृषी पंप, ट्रांसफार्मर मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे. अडचणी दूर करण्यात याव्यात तसेच   शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 1) शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन मिळत नाही. 2)   सौर कृषी पंप योजना फॉर्म भरणे बंद आहे.3)  नवीन ट्रांसफार्मर मिळत  नाही..लाँकडाऊन असल्यामुळे शेतीमालाला एक तर बाजारपेठेत उपलब्ध होत नाही, बाजारपेठ मिळालीच तर कवडीमोल भावाने शेतीमाल विकावा लागतो. सध्या शेतकरी प्रचंड मानसिक, आर्थिक तणावात वावरत असून आपण योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांची होणारी ससेहोलपट थांबवावी या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. याबाबत मा.ना.श्री.नितीनजी राऊत साहेब (उर्जामंत्री, महाराष्ट्र राज्य), मा.ना.श्री.प्राजक्तजी तनपुरे साहेब (राज्यमंत्री नगर विकास ऊर्जा उच्च तंत्र शिक्षण), मा.ना.श्री.विश्वजीत कदम साहेब (कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य), मा.ना.श्री.जयंत पाटील साहेब (जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य) यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत. तरी संबधित विभागाने मागण्या मान्य नाही झाल्यातर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवश्री. राहुल ढेंबरे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांनी दिला आहे.
close