shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रायगड रोहा बलात्कार प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा करावी ..!!

रायगड रोहा बलात्कार प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा करावी ..!!
 
रायगड-मुरूड (जंजिरा)प्रतिनिधी: 
( विकास मेहेतर )

रोहा तांबाडी येथील आमच्या सहकारी सरपंचांच्या मुलीसोबत झालेल्या दुर्दैवी प्रकरणाबाबत रायगड जिल्ह्यातील निवडक सरपंचांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज मा. जिल्हाधिकारी निधी चौधरी व पोलिस अधिक्षक अनिल पारसरकर यांची भेट घेतली.
व सदर प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यात यावे तसेच गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून येणार असलेल्या चाकरमाण्यांच्या संदर्भात चर्चा केली. 

दोन दिवसात यासंदर्भात योग्य आदेश जाहीर करण्यात येईल असा शब्द मा. जिल्हाधिकारी निधी चौधरी यानीं आम्हाला दिलेला आहे. वळले ग्राम पंचायत  सरपंच मा.श्री किशोर नथुराम काजारे बोर्ली ग्राम पंचायत सरपंच मा.श्री. नौषदभाई दळवी ग्रुप ग्राम पंचायत काकलघर महालुंगे च्या सरपंच मा.सौ.साक्षी सतेज ठाकूर तसेच मांडला ग्राम पंचायत सरपंच सुचित्रा सुरेश पालवनकर यांनी नागरिकाना व मुंबईतील चाकरमानी याना सदरचा निर्णय आपणाला दोन दिवसात कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे .
close