shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचा ह.भ.प.निव्रुत्ती महाराज देशमुख(इंदुरीकर)यांस जाहीर पांठिबा..!!

शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचा ह.भ.प.निव्रुत्ती महाराज देशमुख(इंदुरीकर)यांस जाहीर पांठिबा...!!

संगमनेर : प्रतिनिधी :
सविस्तर वृत अशी की काही दिवसांपूर्वी किर्तनात उच्चारलेल्या सम-विषम लिंगी या विधानावरून वरून काही समाजकंटक ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्यावर समाज माध्यमातून स्वतःची प्रसिद्धी करण्याचा खटाटोपाने बदनामीकारक विधाने करत आहेत, महाराजांनी केलेले विधान हे धर्मग्रंथ यांना अनुसरून असून महाराजांवर दाखल झालेल्या केसमुळे सबंध वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी दाखल केलेल्या केसचा पुनर्विचार होऊन त्यांच्यावर समाज माध्यमातून बदनामीकारक होणारी टीका तात्काळ थांबविण्यात यावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
स्वतःच्या प्रसिद्धीसाठी समाज कंटका कडून इंदुरीकर महाराजांची बदनामी होत आहे.तरी सदर बदनामी करणारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.
 अशा आशयाचे निवेदन शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघंटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील,
ह.भ.प.शिवाजी महाराज दाते, शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे राज्य संघटक शिवश्री.दिपक मिंडे, संगमनेर तालुका संघटक शिवश्री.गणेश श्रीराम यांच्यावतीने नायब तहसीलदार श्री.सुधीर सातपुते यांना निवेदन देण्यात आले आहे.
close