shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोनाची झटपट तपासणी होण्यासाठी राहाता तालुक्याला मिळणार पाचशे रॅपिड अॅंटीजीन किड्स : तहसीलदार कुंदन हिरे..!!

कोरोनाची झटपट तपासणी होण्यासाठी राहाता तालुक्याला मिळणार पाचशे रॅपिड अॅंटीजीन किड्स : तहसीलदार कुंदन हिरे..!!

सावळीविहीर(राजकुमार गडकरी):
 आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी शहरात व परिसरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे .त्यामुळे येथेच झटपट कोरोनाची  तपासणी व्हावी, यासाठी राहताचे तहसीलदार कुंदन हिरे यांच्या मागणी नुसार अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे राहाता तालुका  विशेषता शिर्डीसाठी 500 रॅपिड अँटीजीन किटस उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे राहता तालुक्यात शिर्डी येथे किंवा एक ठिकाण तालुक्यात निवडून त्या ठिकाणी झटपट कोरोना टेस्ट होतील.त्यामुळे राहता तालुक्यातील नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहे.
राहता तालुक्यात विशेषत शिर्डी व परिसरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करीत आहेत, मात्र तरीही ही साखळी वाढतच आहे. त्यामुळे राहाता तालुक्यात, शिर्डी व परिसरात कोरोनाचे लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तपासणी येथेच झटपट व्हावी .त्यासाठी असणाऱ्या रॅपिड अँटीजीन किड्स आहेत. अशा सुमारे 500 रॅपिड अँटीजीन  किड्स राहाता तालुक्यासाठी, शिर्डी परिसरासाठी देण्यात याव्यात. अशी मागणी राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी  राहुल द्विवेदी यांच्याकडे केली होती, त्यासाठी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी  ही मागणी तत्वतः मंजूर करत राहाता तालुका व शिर्डी परिसरासाठी त्वरित 500 रॅपिड किड्स उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. ह्या ५०० किड्स शिर्डीला लवकरच मिळणार असून या रॅपिड  अँटी जीन किड्स द्वारे लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तपासणी झटपट करण्यात येऊन हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे.हे  ताबडतोब कळणार आहे, त्यामुळे वेळ जाणार नाही व येथे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ही या  किटसमुळे मोठा फायदा होणार आहे .या  रॅपिड ॲन्टीजीन  किड्समुळे लक्षणे असणाऱ्या रुग्णांची कोरोना तपासणी होण्याचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर त्वरित संस्थात्मक विलगीकरण किंवा कोव्हीड केअर सेंटरला दाखल करून त्यांच्यापासून इतरांना होणारा संसर्ग होणार नाही .वेळही वाचणार आहे. या रॅपिड अँटी जीन किड्स येथे आल्यानंतर त्या द्वारे लक्षणे असणाऱ्या संशयित कोरोना रुग्णांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना राहाता तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद मस्के, तसेच डॉक्टर संजय गायकवाड हे प्रशिक्षण देणार आहेत व उद्या किंवा मंगळवारपासून या 500 रॅपिड अँटीजीन किड्स द्वारे राहाता तालुक्यात योग्य ठिकाण निवडून त्या ठिकाणी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.सोमवार किंवा मंगळवार पासून या रॅपिड किड्सद्वारे  लक्षणे वाटणाऱ्या   रुग्णांची कोरोना तपासणीची येथे सुरुवात होणार आहे.अशी माहिती राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.
close