shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मनसे अंबरनाथ शहरातर्फे नगरपालिका विरोधात "मनसे स्टाईल आंदोलन" करण्याचा इशारा - शहर उपाध्यक्ष राकेश पाटिल...!!

:मनसे अंबरनाथ शहरातर्फे नगरपालिका विरोधात "मनसे स्टाईल आंदोलन" करण्याचा इशारा - शहर उपाध्यक्ष राकेश पाटिल..

:अंनपा अतिरिक्त मुख्याधिकारी धिरज चव्हाण ह्यांना वॉर्ड क्र.५६ मधील समस्या संदर्भात मनसेच्या वतीने लेखी निवेदन..!!

अंबरनाथ (जाफर वणू):

अंबरनाथ शहर पूर्वेकड़ील वॉर्ड क्र.56 मधील पालेगांव पटेल मार्टच्या समोर असलेल्या नदीचे रूपांतर नाल्यात केल्याबद्दल तसेच प्रभागतील इतर समस्या संदर्भात दि. 16 जुलै 2020 रोजी मनसे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश मोतीराम पाटिल व मनसे च्यावतीने अंनप अतिरिक्त मुख्याधिकारी धिरज चव्हाण ह्यांच्याशी चर्चा करीत लेखी निवेदन देण्यात आले.

ह्या परिसरात सद्यास्थितीत 15 ते 16 गृहसंकुल असून या ठिकाणी 4500 ते 5000 लोक वास्तव्यात आहे. तसेच गेल्या वर्षी व या वर्षी पावसाळ्यात पाणी साचुन राहिल्याने ह्या परिसरात निर्माण झालेल्या पुरामुळे सद्या परिस्थित आपणास अवगत करीत आहे. कारण अंबरनाथ शहर पूर्व वार्ड क्र. ५६ मधील पालेगाव पटेल मार्टच्या समोर असलेल्या नदीचे रूपांतर नाल्यात केल्यामुळे ह्या परिसरात निर्माण झालेल्या पुरामुळे गेल्या कित्येक वर्षे मी आपल्या निदर्शनास आणून देत असून सुद्धा केवळ ग्रामीण भाग असल्या कारणाने ह्या प्रभागात अंबरनाथ नगरपालिका प्रशासन जाणून बुजून दुर्लक्षित करीत असल्याचे निषेध राकेश पाटिल ह्यांनी केला आहे.

या परिसरात बिल्डरांकडून नवीन मोठ मोठ्या इमारती उभारण्यात आले आहेत. पण गेल्या दोन वर्षापासून सतत तेथील रस्त्यावर पावसाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर पालेगाव, पटेल मार्ट, विश्वनाथ चौक या ठिकाणी अजूनही व्यवस्थित रस्ते पण तयार झालेले नाहीत. परंतु रस्त्याचे काम पूर्ण झाले नाहीतर गटारे कुठून होतील. तसेच गटारे तयार झाले नाहितर पावसाचे पाणी जाणार कुठून हे समजेना झाले आहे.

तसेच पालेगाव ह्या भागात विकासक (बिल्डर) फक्त इमारती, घरे बांधून मोठं मोठी अमिश दाखवून आपली घरे विकत आहे पण मूलभूत एकही सोय सुविधा अद्याप उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यात यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्याने संपूर्ण रस्तावर पाणी जमा होऊन ते पाणी इमारतीच्या आत घुसत आहे. त्यामुळे इमारती मधील लिफ्ट, विद्युत मीटर व महत्वाची उपकरणे बंद पडली आहेत. तसेच चार चाकी वाहनांचा पण मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचा ना हक्क खर्च लोकांच्या वार्षिक देखभाल खर्च (मेंटेनेन्स) मधून करावा लागतो. जेव्हा ह्यामध्ये विकासक (बिल्डर) इमारत उभी करत होते. त्याच्या आधी त्यांना माहीत होतं की ह्या ठिकाणी एक मोठी नदी आहे. ती नदी रुंद करून घेतली असती तर भविष्यात मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला असता तर पाणी निघून गेले असते. अशी व्यवस्था करायला पाहिजे होती. परंतु विकासक (बिल्डर) ह्यांना तर पैसे कमावण्याची घाई आणि नगरपालिकेचे अधिकारी ह्यांना पण पैसे घेऊन परवाने देण्याची घाई होती. *तसेच परिसर आहे कि नदी..? पालेगावच्या या परिस्थितीला नुकसानीस जबाबदार कोण ? नगरपालिका कि बिल्डर ?  अशा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे.

याप्रसंगी परिसरात दर वर्षी पावसाळ्याचे पाणी जमा होऊन नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास होतोय त्याचे नेमके कारण म्हणजे नदीचे रूपांतर नाल्यात झालेले असून माझी आपणास विनंती आहे की रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून आपण येथील समस्या दूर कराव्यात. अन्यथा अंबरनाथ नगरपालिका विरोधात "महाराष्ट्र नवनिर्माण सेना" पक्षातर्फे तीव्र स्वरूपाचे *"मनसे स्टाईल आंदोलन"* करण्यात येणार असल्याचे *मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटिल* ह्यांनी सांगितले.
close