shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वारकरी सांप्रदायामुळे जीवनात आनंद – श्रीमंत ढोले

वारकरी सांप्रदायामुळे जीवनात आनंद – श्रीमंत ढोले

इंदापूर । प्रतिनिधी
(तात्याराम पवार) 

हरीचे नामजयघोष व सर्व धर्म समानता या विचाराने चालणारा वारकरी सांप्रदाय सर्व भागातील जनतेला कायम आनंद देणारी संकल्पना टिकवूनआहे. असे गौरवोद्गार जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांनी काढले.

इंदापूर तालुका विश्व वारकरी सेनेच्या सहअध्यक्षपदी ह.भ.प आबासाहेब उगलमुगले यांची निवड झाल्याने,पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले,यांच्या हस्ते लाखेवाडी(तालुका इंदापूर)येथे विशेष सन्मान सोहळा पार पडला यावेळी श्रीमंत ढोले बोलत होते. 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते,भवानीगड विकास प्रतिष्ठानचे सचिव हर्षवर्धन खाडे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार यांच्यासह गावकरी उपस्थित होते. पुढे बोलताना ढोले म्हणाले की,विश्व वारकरी सेनेच्या माध्यमातून काम करण्याची संधी ह.भ. प.आबासाहेब महाराज उगलमुगले यांना मिळाली आहे.

 निश्चित आगामी काळात आपल्या पदाच्या माध्यमातून वारकरी यांना असलेल्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी उगलमुगले महाराज प्रयत्नशील राहतील.कोणत्याही सामाजिक कार्यात सातत्याने आवड असणारे व्यक्तिमत्व,असल्याने  विश्व वारकरी सेनेचे अत्यंत आगामी चांगले काम उभे राहील.असा आशावाद श्रीमंत ढोले यांनी व्यक्त केला.
close