shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर एक वर्षांपासून बलात्कार : अँट्रॉसिटी आणि बाललैंगिक अत्याचारासह चौघावर गुन्हा दाखल

केज   |  प्रतिनिधी   ( प्रकाश मुंडे)      
अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सतत एक वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी चौघावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


केज येथे एका अल्पवयीन मुलीवर एका परधर्मीय तरुणाने प्रेम प्रकरणातून तिला भोसरी जि.पुणे येथे पळवून नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्या नंतर तिच्या सोबत लग्न केले. त्या नंतर तिचा सासू, सासरा व नणंद यांनी तिला घरकाम करण्याच्या कारणा वरुन मारहाण व शारिरीक आणि मानसिक छळ सुरू केला. तसेच तिने घर सोडून निघून जाण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली. 

या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून केज पोलीस स्टेशनला तिचा नवरा मजहर अजहर शेख, सासरा अजहर बशीर शेख, सासू.रेहाना अजहर शेख आणि नणंद बिलकिश अजहर शेख यांच्या विरोधात केज पोलिस स्टेशनला गु. र. नं. २८९/२०२० भा. दं. वि. ३७६, ३७६(२), ३७६(जे), ३६३, ३२३, ५०४, ५०६, ३४ तसेच बाल लैंगिक अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा ४, ६, ८, १० आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा ३(१) (आर) (एस) (डब्ल्यू) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे पुढील तपास करीत.

------------------------------------
close