shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लॉक डाउन आणि संचारबंदीचे नियमांचे उल्लंघन होणारे नाही याची दक्षता घ्या - राहुल धस

केज येथे शांतता समितीची बैठक संपन्न
केज | प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे)  :    
बकरी ईद आणि अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमीवर केज येथे शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी प्रभारी पोलीस उपअधीक्षक राहुल धस म्हणाले की, कोरोना संसर्गामुळे आपल्या भागात सुरू असलेले लॉकडाउन आणि संचार बंदीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असून नियमांचे काटेकोर पालन करावे.


केज येथे पोलीस स्टेशनमध्ये बकरी ईद आणि अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस म्हणाले की, सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग व फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन आहे.  त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे सार्वजनिक सण उत्सव आणि जयंत्या या पूर्वीप्रमाणे साजऱ्या करता येणार नाहीत. तसेच शासनाच्या निर्देशाचे उल्लंघन होणार नाही. याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला माजी नगराध्यक्ष कबिरोद्दीन इनामदार, किसन कदम, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, कपिल मस्के, अशोक गायकवाड, गोपाळ मस्के,  अजय भांगे, समियोद्दीन इनामदार, सुमेध शिंदे,शिवाजी (आप्पा) हजारे,शकिल सय्यद,लक्ष्मण जाधव, रवि अंधारे,बाळासाहेब ओव्हाळ आदिंची उपस्थिती होती.
close