धनगर साम्राज्य सेनेचे वाशीम जिल्हाध्यक्ष शुभम ढवळे यांनी दहावीच्या वर्गात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा देऊन सत्कार केला..!!
या सत्काराने गुणवंत विद्यार्थी चांगलेच भारावून गेले..!!
जऊळका । प्रतिनिधी :
धनगर साम्राज्य सेनेचे वाशिम येथील नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शुभम ढवळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत दहावीच्या निकालानंतर जवळका रेल्वे येथील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. लाकडाऊन च्या काळात एकत्र जमणं शक्य नसल्याने त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांची भेट घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली .या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कौतुकाने गुणवंत विद्यार्थी चांगलेच भारावून गेले.
जवळका रेल्वे येथील श्री शिवाजी विद्यालयातील विद्यार्थी गोपाल आत्माराम ढवळे यास 90% तर अनंता विठ्ठल चितरग यात 80 टक्के गुण मिळाले.
जऊळका गावामधील उपस्थित गणेश ढवळे,अजय ढवळे, ओम गावंडे ,अजय वैरागढ, आकाश भोसले, जिवन गावंडे, संजय चव्हाण, राजु गावंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. या दोघांचे परिसरातून कौतूक होताना दिसत आहे.

