वसंत विद्यालय केज च्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेतील विद्यार्थ्यांचा माननीय रमेश आडसकर यांच्या हस्ते सत्कार ....!!
केज | प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे) :-
अस्वले प्रेम 97.20% मार्क घेऊन शाळेत सर्वप्रथम
मार्च 2020 मध्ये दहावी बोर्ड परीक्षेत वसंत विद्यालय केजचा यशस्वी आलेख सातत्याने उंचावताना पहावयास मिळत आहे .शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव माननीय रमेश आडसकर यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम अस्वले प्रेम 97.20 टक्के, सर्व दुतीय श्रद्धा ठोंबरे 95.60 टक्के तर कांबळे गणेश 95.20 %गुण घेवून यशस्वी ठरला यावेळी मा रमेश आडसकर यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर शिक्षणाची दिशा शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण याबद्दल विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे विविध शाखेचे मुख्याध्यापक उपस्थित होते यामध्ये मुजफ्फर इनामदार, अनिल कोठावळे, राऊत आर एन्, एम पी मोरे, धेंडे पी डी, देशमुख डि के ,सुरवसे एच एम , थोरात शरद थोरात, नखाते रवी, प्रशांत देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

