उमरीच्या धनंजय नखाते नी घेतले सर्व विषयात ३५ गुण..!!
शेतमजुरी करणाऱ्याचा मुलाचे यश..!!
केज : प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे) :
माजलगाव तालुक्यातील उमरी येथील शेतमुजरी करणाऱ्याचा मूलाने दहावी परिक्षेत सर्व विषयात ३५ गुण घेऊन दहावी परिक्षा उतीर्ण झाला आहे नखाते ने सर्व विषयात ३५ गुण घेण्याचा पराक्रम केलेला जिल्ह्यातील पहीला विद्यार्थी आसुन त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
तालुक्यातील उमरी येथील शेत मजुर नारायण नखाते यांना तिन मुले पैकी दोन मुले शेतमजुरी करतात तर धनंजय हा गावतील रामेश्वर विद्यालयात मध्ये दहावी मध्ये शिक्षण घेत होता त्याला कसल्याही प्रकारे क्लासेस नव्हते तो शाळेच्या सुट्टी मध्ये आई वडीला बरोबर शेता मजुरी करण्यासाठी जात होता वर्षभर जिद्दीने काही तरी वेगळं करून दाखवनार हि जिद्द त्याने मनी बाळगून दहावी परिक्षेत वेगळा पराक्रम करुन उतीर्ण झाला. तो ही सर्व विषयात ३५ गुण घेऊन.
धनंजय दहावी परिक्षा ३५ गुण घेऊन पास झाला आहे हे त्याच्या मोठ्या भावांना व आई वडीलांना माहीती होताच डोळ्यातुन आनंद आश्रू आले.धनंजय ने सर्व विषयात ३५ गुण घेऊन स्वा:तासह गावाचे नाव झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

