shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यात होणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अन्याय अत्याचार निर्मूलन समिती शिर्डी यांच्या वतीने पाठिंबा..!!

शिर्डी प्रतिनिधी /कु.किरण जाधव:
दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था आज अतिशय दयनीय झाली आहे . शेतकरी आज दूध संघामध्ये 20 ते 22 लिटर रुपयाने दूध विक्री करत आहे.

लॉकडाऊन मुळे दुधाची खपत कमी झाली .
पिशवीबंद दुधाची मागणी देखील कमी झाली आणि लॉक डाऊन च्या काळामध्ये हॉटेल्स ,चहाच्या टपऱ्या बंद असल्यामुळे त्याचबरोबर दुधापासून बनणाऱ्या प्रॉडक्ट ची मागणी कमी झाल्यामुळे दुधाचे दर कमी झाले. यावर सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे अपेक्षित होते.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.
शेतकरी वाचला तर देश वाचेल . भारत हा कृषीप्रधान देश असून त्याची ख्याती जगभर आहे.व त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या दुधाला सरकारकडून दहा रुपये अनुदान मिळावे व दूध संघाने ते 30 रुपये प्रति लिटर ने खरेदी करावें या मागणीला शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या मागणीला अन्याय अत्याचार निर्मूलन समिती चे माननीय श्री रवींद्र दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय रमादेवी जी धीवर मॅडम (अहमदनगर जिल्हाध्यक्षा), श्री. निखील भाऊ भोसले (युवक जिल्हाध्यक्ष ),  कु.किरण जाधव (अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी शहर युवा अध्यक्ष आकाश (राहुल) जाधव, राहाता तालुका उपाध्यक्ष रचना पाटील यांनी आज शिर्डी पोलिस स्टेशन ला निवेदन दिले.

अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्याकडून जाहीर  पाठिंबा देण्यात येत आहे.
close