shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ब्राह्मणीत चोरट्यांचा सुळसुळाट..!!

राहुरी (ब्राम्हणी):  आधीच कोरोना संकटाच्या सावटाखाली असलेल्या ब्राह्मणीकरांना आता चोरट्यांच्या दहशतीने ग्रासले आहे . काल रात्री चोरट्यांनी येथील अनेक  दुकानांचे शटर कटावणी च्या साह्याने  उचकटून दुकानातील सामान व काही रोख रक्कम चोरून  पोबारा केला आहे. गावात आधीच कोरोमा ची दहशत व आता चोरांची दहशत यामुळे येथील व्यावसायिक मात्र पूर्णतः दहशतीखाली गेले आहेत.


कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी  गेल्या दोन दिवसापासून गावातील संपूर्ण व्यवसाय व पूर्ण गाव  बंद करण्यात आले आहे. मात्र  रात्री झालेल्या चोऱ्यांमुळे येथील व्यवसायिक मात्र  चांगलेच भेदरलेले आहेत.  राहुरीचे कर्तव्यदक्ष समजले जाणारे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी स्वतः या प्रकरणी त्वरित  व सखोल  लक्ष घालून  या चोरट्यांचे  मुळे जाळे उखडून काढून त्यांना त्वरित जेरबंद करावे. अशी  कळकळीची मागणी  येथील व्यवसायिकांतून होत आहे.
close