हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१२, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथे औरंगाबाद वरून आलेल्या कुटुंबाने काँरंटाईन राहा म्हणने सरपंचाचे न ऐकल्याने पाच जणांविरुद्ध सेनगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
देशावर आणि राज्यावर उद्भवलेले कोरोना सारखे संकट भयंकर असतांनाही काही व्यक्ती शासनाच्या नियमाची पायमल्ली करत असताना समोर येत आहेत त्यातील एक प्रकार सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथे घडला आहे औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेले एक कुटुंब 10 जुलै शुक्रवार रोजी भानखेडा येथे दाखल झाले त्या कुटुंबाला व्ही आर आर टी कमिटीने काँरटाईन राहण्यास संदर्भात सूचना केल्या मात्र त्या कुटुंबाने कोणत्याही सूचनेचे पालन न करता गावभर वास्तव केलं त्यामुळे गावावर मोठे संकट ओढवू शकते या भीतीने सरपंच सौ कोटकर यांनी सेनगाव पोलीस स्थानकात सदर कुटुंब ऐकत नसल्याची फिर्याद 12 जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास दिली आहे औरंगाबाद शहरात कोरोना चा प्रार्दुभाव सर्वाधिक असून त्याठिकाणी डेंजर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे त्या शहरातून कामाला गेलेले कुटुंब 10 जुलै रोजी आपल्या परिवारासह मूळ गावी परत आले या कुटुंबाला काँरटाईन राहण्यास संदर्भात व्ही आर आर टी कमिटीने सूचना देऊनही हे कुटुंब गावभर फिरून कोरोना सारख्या संकटाला निमंत्रण देत असल्याकारणाने व सरपंचानी सूचना देऊनही ऐकत नसल्या मुळे सरपंच सौ कोटकर यांनी या कुटुंब प्रमुखासह चार जणांविरुद्ध सेनगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केल्याची घटना समोर आली आहे या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या व पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एन. राठोड हे करीत आहेत या कुटुंबा विरुद्ध कलम 188, 269, 270 भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

