shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार विनायकराव मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न..!!

आमदार विनायकराव मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न..!!

पुणे : प्रतिनिधी:-
शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद चे संस्थापक अध्यक्ष व शिव स्मारक समिती मुबई मा श्री आमदार विनायकराव मेटे साहेब यांच्या 57 व्या वाढदिवसाच्या निमित्त पुणे शहरामध्ये शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद सामाजिक न्याय विभाग कडून कोथरुड मतदार संघात विविध कार्यक्रम आयोजित करून मेटे साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये वृक्ष रोपण केले व गरजु नागरिकांना अन्न धान्य च्या स्वरूपात किट वाटप करण्यात आले.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ते कोथरुड कर्वेनगर या भागातील नागरिकांना व रुग्ण सेवा मोफत रिक्षा सेवा देण्यात आली.
      या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग मा श्री कल्याण अडागळे, पुणे शहर संघटक अरविंद वाघमारे यांनी केले. विशेष प्रतिनिधी फौंजदार टाईम्सचे राजेश वाघमारे यांनी मोलाचे सहकार्य केले.
       या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते मा श्री मयूर मोहिते, मंगेश वाघमारे हे उपस्थित होते.
close