shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोनाबाधित रुग्णांचे उपचारासाठी जळगाव जिल्ह्यात रुग्णालये अधिग्रहित करण्यात आली आहेत, तसेच 12 खाजगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. उपचार देयकाबाबत अडचणी/तक्रार असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांचेशी संपर्क साधावा.

जळगाव प्रतिनिधी /प्रमोद चौधरी : 
जळगाव जिल्ह्यांमध्ये covid-19  वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना का बोलले जात आहेत सदर उपयोजना चा एक भाग म्हणून covid-19 बाधित संशयित रुग्णांवर उपचार व देखभाल करण्याच्या दृष्टीने जळगाव जिल्ह्यातील काही शासकीय रुग्णालय तसेच काही खाजगी रुग्णालय देखील Dedicated Covid हा Hospatil म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालय जळगाव तसेच जळगाव जिल्ह्यातील पूर्णतः खाजगी तत्त्वावर चालविण्यात येणारे हॉस्पिटल्स यांचा समावेश आहे.




सदर बाबतीत जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात येते की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे कोरुना आजारावरील उपचार पूर्णतः मोफत केले जातात गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज रुग्णालय जळगाव येथे देखील पूर्ण आजारावरील उपचार पूर्णतः मोफत केले जातात तसेच प्रशासनाकडून आज पावतो परवानगी देण्यात आलेल्या पूर्णता खाजगी तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या बारा हॉस्पिटल्समध्ये covid-19 अधिक रुग्णांवर उपचार केले जातात अशा प्रकारे परवानगी देण्यात आलेल्या खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या वैद्यकीय बिलाचे शासन निर्णय दिनांक 21 मे 2020 मधील नमूद तरतुदींच्या अधीन राहून लेखा परीक्षण करणे आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून गठीत करण्यात येणाऱ्या पथकामार्फत सदर खासगी रुग्णालयाच्या बिलांचे Random Basis वर तसेच सदर बिलाबाबत होणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने लेखापरीक्षण करण्यात येत आहे याबाबत कोणास तक्रार नोंदवायचे असल्यास अथवा संबंधित रुग्णालयाकडून आकारण्यात येणाऱ्या बिलाबाबत शंका असल्यास नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव यांच्याशी संपर्क साधून आवश्यक ते सहकार्य प्राप्त करून घ्यावे
close