shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोनाने एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू..!!

सोनई । प्रतिनिधी :( मोहन शेगर )

नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले एका पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांचा आहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नेवासा येथील कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले होते.



मात्र तीन,चार दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिक खालवल्याने या पोलिस कर्मचाऱ्याची रवानगी नगर येथिल  जिल्हा रुग्णालयात नंतर एका खासगी रुग्णालयात करण्यात आल्याची माहिती मिळते. मात्र दुर्देवाने सोमवार (दि.३) रोजी दुपारी या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे माहीती समोर आली आहे. या घटनेने नेवासा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली असून नेवासा तालूक्यातील ४० टक्के पोलिसांच्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत तर ६० टक्के पोलिसांच्या तपासण्या करण्यात आलेल्या नसल्यामुळे पोलिस दलात धाकधुक वाढली आहे.

जनतेच्या रक्षणासाठी सद् रक्षणाय...खलनिग्रहणाय हे बिद्र घेवून जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा कोरोनाच्या महामारीत मृत्यु झाल्याने आता तरी ६० टक्के पोलिसांच्या कोरोना टेस्ट करण्यास गृहखाते धजावणार का? असा सवाल सुज्ञ नागरीकांतून व्यक्त केला जात आहे. इतर कर्मचारी टेस्ट करू घेण्यास इच्छुक असूनहि टेस्ट का केली जात नाही यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी पोलिस कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
close