प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई :- सोनई गावात आज 12 जणांचे कोरोना पाॅझिटिव रिपोर्ट आरोग्य विभागाला प्राप्त झाले असल्याची माहिती सोनई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैघकिय अधिकारी डाॅ.राजेंद्र कसबे यांनी दिली आहे.आज नेवासा कोविड सेंटर मधील रेपिड ॲन्टिजेन तपासणीत 1 रूग्ण बाधित आढळला.तर खाजगी लॅब मधील दोन तीन दिवस मिळुन 11 बाधित रूग्णाचे अहवाल आज आरोग्य केंद्राला प्राप्त झाले असल्याचे माहिती डाॅ.कसबे यांनी दिली आहे.तसेच सोनई जवळील घोडेगाव मध्येही आज रेपिड ॲन्टिजेन तपासणीत 7 जण बाधित आढळले आहेत. सध्या कोरोना रूग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. तसेच विनाकारण घराबाहेर पडु नये.
गावात गर्दी करू नये सोशल डिस्टन्सचे नियम पाळावे.कायम तोंडाला मास्क लावावे.तसेच कामावरून घरी आल्या नंतर सॅनिटायझरने हात धुवुन स्वच्छ गरम पाण्याने अंघोळ करून कपडे धुण्यासाठी टाकावे. आपल्या घरी रोज मालेगाव काढा घ्यावा.किंवा गरम पाण्यात हळद मिठ टाकुन गुळण्या कराव्यात. थोडे जरी आजारी पडला तर लगेच दवाखान्यात जावुन उपचार घ्यावे अंगावर काढु नये.प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी रोज योग प्राणायम व हलका व्यायाम करावा.विनाकारण कुठे लग्ण समारंभ,छोटेमोठे कार्यक्रम, अंत्यविधी आदी ठिकाणी गरज नसताना गर्दी करू नये.आपन काळजी घेतली तरच आपन या कोरोना महामारीला हरवु शकतो.कोरोना आजाराची लस विकसित करण्यात येत असुन ती लवकरच येणार असल्याने आपन तो पर्यंत आपन आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन सोनईचे आरोग्य अधिकारी डाॅ.राजेंद्र कसबे यांनी केले आहे.


