हिंगोली । प्रतिनीधी (विश्वनाथ देशमुख)➤
दि.२४,मार्च महिन्यापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर दक्षतेच्या उपाययोजना म्हणुन हिंगोली जिल्ह्यातील सर्व लाँजिंग बंद करण्यात आल्या आहेत.आता केंद्र शासनाची अनलाँक ३ चालु झालेली आहे तर राज्य शासनाची बिगेन अगेन सुरु झालेली आहे.राज्यभर परिवहन विभागाने एस.टी.बसेस पण चालु केल्या आहेत त्यामूळे जिल्ह्यातील लाँजिंग व्यवसाय चालु करण्याच्या मागणीचे निवेदन आज दि.२४ आँगष्ट सोमवार रोजी जिल्हाधिकारी यांना व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,जिल्ह्यातील सर्वच व्यवसाय चालु करण्यात आले आहेत परंतु लाँजिंग चालु करण्याबाबत अजुन ही परवानगी देण्यात आली नाही.त्यामुळे या व्यवसायात गुंतवणूक करणारे व्यवसायिक मोठ्या अडचणीत आले आहेत तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेले कामगारांची पण रोजगार न मिळाल्याने उपासमार होत आहेत.कोविड१९ ह्या संसर्गजन्य रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने अटी व शर्ती लावुन परवानगी द्यावी त्यांचे पालन व उपाययोजना करुनच हा व्यवसाय सुरु करण्याकरीता परवानगी देण्यात यावी.निवेदनावर नंदकिशोर तोष्णीवाल,अनिल नैनवाणी,गजेंद्र बियाणी,रविंद्र सोनी,शंभुसिंह गहलोत,सुशिल मुंदडा,सुमित चौधरी,नरेश देशमुख,ओम नैनवाणी,उमेश भट्ट,रवि नैनवाणी,गजानन बासटवार आदींसह हिंगोली व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्ष-या आहेत.