shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पावसाने मागील 46 वर्षांतील विक्रम मोडला, दक्षिण मुंबईतही साचले पाणी..!!

मुंबई - मुंबईत बुधवारी विक्रमी पावसानंतर गुरुवारी संततधार सुरुच आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज (दि.6) दुपारी 1 वाजून 51 मिनिटांनी भरती येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

याबाबत अलर्टही जारी करण्यात आला आहे. पावसाचा जोर पाहता महाराष्ट्रातील अनेक भागांत एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, बुधवारी मुंबईत या हंगामातील सर्वाधिक पाऊस पडला. पावसाने मागील 46 वर्षांतील विक्रम मोडला आहे. दक्षिण मुंबईतील अनेक भागात पाणी साचले होते. मागील 24 तासांत 331.8 मिमी पाऊस नोंदवण्यात आल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.बुधवारी मुसळधार पावसामुळे मुंबईतील नायर रुग्णालयात पाणी तुंबले होते. 

हवामान विभागानुसार, कुलाबामध्ये सर्वाधिक 331.8 मिमी पावसाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे मागील 24 तासांत 162.3 मिमी पाऊस पडला. मुंबई शहर आणि उपनगरात पुढील तीन ते चार तासांपासून हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर त्यांना पत्रकारांनाही वार्तांकन करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
close